शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मंडप सजला, वऱ्हाडी जमले, लगीन लागलं देवाचं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 06:18 IST

या सोहळ्यानिमित्त गेल्या पाच दिवसात मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.

पंढरपूर (जि़सोलापूर) : पंढरीतील श्री विठ्ठल मंदिरात फुलांचा मंडप सजला... हजारो वराडी जमले...अन अक्षदा पडल्या...विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा पार पडला... अन् लगीन देवाच लागलं. वसंतपंचमीचं औचित्य साधून गुरुवारी मोठ्या जल्लोषात विठ्ठल-रखुमाईचा विवाहसोहळा पार पडला. अवघ्या पंढरीला या निमित्ताने आनंदला भरते आल्याचे चित्र दिसून आले.

या सोहळ्यानिमित्त गेल्या पाच दिवसात मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. विवाह सोहळ्यासाठी मंदिरात गावोगावच्या भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी ९ वाजता ह.भ.प. अनुराधा शेटे यांनी रूक्मिणी स्वयंवरांची कथा सभामंडपात सुरू केली. याचदरम्यान विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये मानाचा गुलाल नेण्यात आला. हा गुलाल श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर उधळण्यात आला.यानंतर मुख्य विवाहसोहळयाला सुरूवात झाली. मूर्तीच्या कपाळी मंडवळया देखील बांधण्यात आल्या. दोन्ही देवतांच्या मधोमधे आंतरपाठ धरण्यात आला. शुभमंगल सावधान जयघोष झाला. हजारो भक्तांनी अक्षता टाकल्या आणि विठठल-रखुमाईचे लग्न लागले.महिनाभर देवाला पांढरे वस्त्रश्री विठ्ठलावर वसंत पंचमी ते रंगपंचमी पर्यंत रोज गुलाल आणि केशर पाणी टाकले जाते. तसेच या महिन्याभराच्या कालावधी मध्ये देवाला रोज पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले जातात.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर