शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्षाळ पूजेने विठ्ठल-रुक्मिणीचा शिणवटा दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 03:48 IST

अनेक वर्षांची परंपरा : केशरयुक्त पाण्याने घातले स्नान; दैनंदिन नित्योपचार पूर्ववत सुरू

पंढरपूर (जि़सोलापूर): आषाढी वारी सोहळ्यादरम्यान २४ तास अखंडपणे उभे दर्शन दिल्यामुळे देवाला आलेला थकवा किंवा शिणवटा दूर करण्यासाठी प्रक्षाळपूजा करण्यात आली. या पूजेप्रसंगी विठ्ठल-रुक्मिणी मातेस केशरयुक्त पाण्याने स्नान घालण्यात आले़ त्यानंतर, खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. शिवाय रात्री १४ पदार्थ घालून खास बनविण्यात आलेला काढाही दाखविण्यात आला़ ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

पंढरीत येणाऱ्या प्रत्येक भक्ताला विठ्ठलाचे दर्शन घडावे, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी माता हे रात्रंदिवस अखंडपणे उभे असतात, अशी श्रद्धा आहे. यात्रेच्या काळात मंदिरातील दररोजचा पहाटेचा काकडा, सायंकाळी साडेपाच वाजताचे दागिने, पोशाख घालणे, सायंकाळी धूप आरती, रात्री शेजारती असे नित्योपचार बंद असतात. यात्रेच्या आधीच देवाचा पलंगदेखील काढण्यात येत असतो. त्यामुळे भक्तांना अहोरात्र अखंडपणे दर्शन देऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला थकवा येतो, असे मानले जाते. देवाला आलेला थकवा किंवा शिणवटा काढण्यासाठीच आषाढी वारी सोहळ्यानंतर मंदिरात खास प्रक्षाळपूजेचा उत्सव साजरा करण्याची ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. त्यानुसार २१ जुलै रोजी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीमातेला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घालण्यात आले़प्रक्षाळ पूजा मंदिरे समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी सपत्नीक केली. प्रक्षाळपूजेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीस पारंपरिक दागिने व आकर्षक पोशाख परिधान करण्यात आला होता. तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाºयाला देखील विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते़ आजपासून श्री विठ्ठलावरील रोजचे नित्योपचार सुरू करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. प्रक्षाळपूजेनंतर मंदिरातील विठ्ठलाचे व रुक्मिणीमातेचे दैनंदिन नित्योपचार पूर्ववत सुरु झाले. पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणीला पारंपरिक दागिने व आकर्षक पोशाख परिधान करण्यात आला होता़ गाभाराही फुलांनी सजविण्यात आला होता़

१४ पदार्थांपासून बनविला काढाश्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा थकवा दूर व्हावा, यासाठी खास काढा देण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार गवती चहाची पाने, गूळ, जायफळ, लेंडीपिंपळी, ज्येष्ठमध, काळे मिरे, काजू, बदाम, खारीक, सुंठ, बेदाणा, लवंग, वेलदोडा, चारोळे आदी विविध पदार्थांपासून खास काढा बनविण्यात आला होता़ हा काढा रात्रीच्या वेळी विठ्ठलाला दाखविण्यात येतो. भक्तांना यात्राकाळात २४ तास दर्शन देऊन विठ्ठलाला आलेला शिणवटा किंवा थकवा या काढ्यामुळे दूर होतो, अशी यामागची भावना असल्याचे सांगण्यात आले़

टॅग्स :Pandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर