शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातून अ‍ॅट्रॉसिटीच्या ३०० तक्रारी, पालिका, पोलीस अधिकाºयांवर संताप व्यक्त केला संताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:56 IST

कायदेशीर मार्गाने आंदोलन करीत असताना जाणीवपूर्वक मारहाण करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. जातीय द्वेष मनात ठेवून शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिका व पोलीस आयुक्तालयातील वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकाºयांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीच्या ३०० तक्रारी करण्यात आल्या आहेत. मंगळवारी जिल्हा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देजातीय द्वेष मनात ठेवून शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिका व पोलीस आयुक्तालयातील वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकाºयांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीच्या ३०० तक्रारीकायदेशीर मार्गाने आंदोलन करीत असताना जाणीवपूर्वक मारहाण करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाश्रीशैल गायकवाड यांच्यासह ३०० कामगारांनी वैयक्तिक पातळीवर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह १० ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या आहेत

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७ : कायदेशीर मार्गाने आंदोलन करीत असताना जाणीवपूर्वक मारहाण करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. जातीय द्वेष मनात ठेवून शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिका व पोलीस आयुक्तालयातील वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकाºयांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीच्या ३०० तक्रारी करण्यात आल्या आहेत. मंगळवारी जिल्हा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात येणार आहेत.आठ महिन्यांपासून नियमित वेतन न मिळाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघटनेच्या वतीने दि. २ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९ वाजता कायदेशीर परवानगी घेऊन आंदोलन केले जात होते. तेव्हा आंदोलन मोडीत काढण्याच्या उद्देशाने संघटनेचे अध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. त्यांचा ९० हजारांचा मोबाईल फोडण्यात आला. कामगारांना मारहाण करण्यात आली व त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. आयुक्तांवर खुनीहल्ला करण्यात आला, फिर्याद देऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वास्तविक पाहता आयुक्तांवर खुनीहल्ला केला असता तर त्यांना थोडीतरी इजा झाली असती. महापालिकेत काहीतरी नुकसान झाले असते, असा कोणताही प्रकार घडला नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेºयात रेकॉर्ड झाला आहे. त्यात कुठेही खुनीहल्ला करताना दिसत नाही. श्रीशैल गायकवाड यांच्या हातात रॉकेलची बाटली दिसत नाही. असे असताना खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कर्मचारी संघटनेवर अन्याय झाला आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आयुक्त अविनाश ढाकणे, उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त अपर्णा गीते, पोलीस निरीक्षक एन. जी. अंकुशकर,                 गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक              आय. एस. सय्यद, पोलीस उपनिरीक्षक एस. सी. पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक जे. जी. कजाकवाले यांच्या विरोधात श्रीशैल गायकवाड यांच्यासह ३०० कामगारांनी वैयक्तिक पातळीवर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह १० ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या आहेत.  जिल्हा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात येणार आहे. एकाच वेळी ३०० कर्मचाºयांनी ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या तक्रारी करण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच धक्कादायक प्रकार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका