शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

हुलजंती यात्रेदरम्यान जमावबंदी आदेशाचा भंग; ७४ भाविकाांविरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 08:59 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मंगळवेढा : हुलजंती येथील महालिंराया यात्रेदरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश असतानाही एकत्र येवून गर्दी करून तोंडाला मास्क न लावता, सोशल डिस्टिंसिंगचे पालन न करता शासनाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी सुमारे ७४ लोकांविरूद्ध मंगळवेढा पोलिसात रात्री उशीरा गुन्हे दाखल करण्यात आले.या घटनेची हकीकत अशी की, दि.१५ रोजी दुपारी ३ वाजता हुलजंती येथील महालिंगराया यात्रा असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयात जमावबंदी आदेश पारित करून १४४ कलम लागू केले होते. महालिंगरायांच्या मंदिराजवळ अमोगसिद्ध तम्मण्णा पुजारी, शरणप्पा आण्णाप्पा पुजारी, काशीराम शिलवंत पुजारी, शरणप्पा आर. पुजारी आदी बिरोबा देवाच्या पालखीसोबत तर तुकाराम शाम वडीयार,काशीनाथ श्रीमंत वडीयार,बिराप्पा व्यंकटप्पा वडीयार (सर्वजण रा.शिरढोण), भरोबा मासाळे, गुडाप्पा मासाळे (उमरगा), देवस्थान ट्रस्टचे यलगोंडा पटाप, बाळासाहेब जकराया पेटरगी, म्हाळाप्पा तुकाराम पुजारी,यशवंत रामगोेंडा पाटील, रायाप्पा धोंडाप्पा काटे (सर्व रा.हुलजंती) या १४ लोकांसह इतर ५० ते ६० लोकांनी एकत्र येवून तोंडाला मास्क न लावता, सोशल डिस्टिंसिंगचे पालन न करता, सॅनिटायझरचा वापर न करता शासनाच्या नियमाचा भंग केला असल्याचे पो.ना.राजकुमार ढोबळे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.

दरम्यान, गर्दीस पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनाही  न जुमानता तशीच गर्दी करून शासनाच्या नियमाचा भंग केला आहे म्हणून वरील सर्वाविरूद्ध साथीचे रोग प्रतिबंधक व महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस