गाव छोटं, पण मतदान सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:20 AM2021-01-17T04:20:35+5:302021-01-17T04:20:35+5:30

उत्तर सोलापूर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे १९४ सदस्य निवडीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. एकूण ४६ हजार ३४६ मतदारांपैकी ३६ ...

The village is small, but the turnout is highest | गाव छोटं, पण मतदान सर्वाधिक

गाव छोटं, पण मतदान सर्वाधिक

Next

उत्तर सोलापूर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे १९४ सदस्य निवडीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. एकूण ४६ हजार ३४६ मतदारांपैकी ३६ हजार ११८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १६ हजार ८३८ महिला व १९ हजार २८० पुरुषांनी मतदान केले. बेलाटीत सर्वात कमी ६७ टक्के, तर वडाळ्यात ७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भागाईवाडीत ४९१ मतदारांपैकी ४६२ इतके म्हणजेच ९३ टक्के मतदारांनी मतदान केले. बेलाटीत सर्वात कमी १८८० पैकी १२९१ इतकेच मतदान झाले. वडाळ्यात ४२५० पैकी २९१३ म्हणजे ७० टक्के मतदारांनी मतदान केले.

नान्नजमध्ये मोठ्या चुरशीने ७३ टक्के, तिर्हे ७५ टक्के, तेलगाव ८० टक्के, खेड ८८ टक्के, बीबीदारफळ ८० टक्के, कोंडी ७६ टक्के, गुळवंची ८४ टक्के, होनसळ ९२ टक्के, हिरज दोन जागांसाठी ७७ टक्के, कळमण ७५ टक्के, बाणेगाव ७९ टक्के, भोगाव ८२ टक्के, तळेहिप्परगा ८० टक्के, हगलूर ८३ टक्के, एकरुख- तरटगाव ७८ टक्के, राळेरास दोन जागेसाठी ८८ टक्के, सेवालालनगर ८८ टक्के, साखरेवाडी दोन जागेसाठी ७८ टक्के तर वांगीत ८८ टक्के मतदारांनी मतदान केले. तालुक्यात एकुण ७७.१३ टक्के मतदान झाले.

Web Title: The village is small, but the turnout is highest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.