शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

विजय, आर्यन शुगरच्या मालमत्तेवर ताबा

By admin | Updated: August 6, 2014 01:04 IST

जिल्हा बँकेची कारवाई : थकबाकी न भरल्याने उचलले पाऊल

सोलापूर : थकबाकीच्या रकमेसाठी आर्यन शुगर, खामगाव व विजय शुगर, करकंब यांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्याची नोटीस जिल्हा बँकेने बजावली आहे. थकबाकीचा विषय उच्च न्यायालयात सुरू असतानाच जिल्हा बँकेने वसुलीसाठी मालमत्ता ताब्यात घेण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकबाकी वसुलीचा विषय सध्या ऐरणीवर आहे. जिल्ह्यातील साखर कारखाने व अन्य संस्थांनी बिगरशेतीसाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम थकल्याने बँक अडचणीत आली आहे. थकबाकीचे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्याने बँकेला न्यायालयातही उत्तरे द्यावी लागत आहेत. यामुळे बँकेने थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच लावण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या संबंधित बार्शी तालुक्यातील खामगाव येथील आर्यन शुगर व माजी उपमुख्यमंत्री, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील विजय शुगरला कलम १३(२) अन्वये ७ एप्रिल २०१४ रोजी ६० दिवसांत देय रक्कम भरण्याची नोटीस पाठविली होती. २८ फेब्रुवारी २०१४ अखेर विजय शुगरकडे मुद्दल व व्याजाची ८४ कोटी २४ लाख ७० हजार इतकी रक्कम होती. याच तारखेला आर्यन शुगरकडे ९३ कोटी दोन लाख ५१ हजार इतकी मुद्दल व व्याजाची रक्कम थकीत होती. जिल्हा बँकेने दिलेल्या नोटीसप्रमाणे विजय शुगर व आर्यन शुगरने मुद्दल व व्याजाची रक्कम भरली नाही. कलम १३(४) नियम ९ अन्वये बँकेने २७ जुलै रोजीच मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा घेतला असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. दोन्ही साखर कारखान्यांचे प्लॅन्ट, मशिनरी, कारखाना व इमारतीचा ताबा घेतल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. -------------------------