शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जयसिद्धेश्वरांच्या व्हिडीओ क्लिपचे तीव्र पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 06:01 IST

सोलापूर : सुट्टीत तुम्ही देवाला जाऊ नका, तेथे देव तुम्हाला भेटणार नाही, बोलणारा देव मीच आहे, असे वक्तव्य असलेला ...

सोलापूर : सुट्टीत तुम्ही देवाला जाऊ नका, तेथे देव तुम्हाला भेटणार नाही, बोलणारा देव मीच आहे, असे वक्तव्य असलेला सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांच्या व्हायरल व्हिडीओ क्लिपवर अनेकांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर यांनी देवाला जाऊन नका, मंदिरात देव भेटणार नाही, बोलणारा देव मीच आहे असे वक्तव्य करून जनसामानच्या भावनेला हात घातल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मनोहर सपाटे यांनी केला आहे. संत तुकाराम महाराज यांनी सामान्य माणसात देव आहे असे म्हटले आहे. पण जयसिद्धेश्वर यांनी देव मीच असे म्हणून महाराजाचे अस्तित्व नाकारले आहे. पंढरपूर, तुळजापूरला जाऊ नका असे म्हणून तमाम जनतेचा अपमान केला आहे. एका पक्षाच्या जबाबदार उमेदवाराच्या तोंडी अशी असंवैधानिक भाषा सोबत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी जयसिद्धेश्वर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. स्वत:ला देव म्हणणे हा अहंभाव आहे. लोकसभेसाठी उमेदवारी मिळाल्यामुळे ते घसरले आहेत अशी प्रतिक्रिया दिली. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अ‍ॅड. गोविंद पाटील हे हास्यास्पद विधान असल्याचे म्हटले.माफी मागा : मलिकभाजप उमेदवार जयसिद्धेश्वर महाराज यांच्या वक्तव्यावर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमित शहा व रावसाहेब दानवे यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. वर्धाच्या सभेत रिकाम्या खुर्च्या बघून मोदींचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकViral Photosव्हायरल फोटोज्