शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात रेल्वेच्या २४ एकरावर फुलणार वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 12:40 IST

सामाजिक वनीकरण, मध्य रेल्वे यांचा संयुक्त उपक्रम

ठळक मुद्दे७ हेक्टरवर ७,७०० झाडे लावली जाणारजिल्ह्यातील मोठा उपक्रम राहणार७ हजार ७०० खड्डे खोदून घेण्यात आले

काशिनाथ वाघमारे सोलापूर : मध्य रेल्वे आणि सामाजिक वनीकरण विभाग यांनी मीटरगेज रेल्वेच्या २४ एकर जागेवर वनराई फुलवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़ स्मृती उद्यानासमोरील जागेवर ही वनराई १ ते ३१ जुलै २०१८ दरम्यान ७ हजार ७०० वृक्ष लागवड करुन फुलवली जाणार आहे़ यामुळे शहराच्या हिरवाईत भर पडणार आहे, तापमान घटवण्यासही काहीअंशी मदतच होणार आहे़ 

१ ते ३१ जुलै दरम्यान शासन राज्यभरात १३ कोटी वृक्ष लागवड करीत आहे़ या योजनेंतर्गत स्मृती उद्यानासमोर झाडे लावली जात आहेत़ प्राथमिक स्तरावर अक्षय्यतृतीयेच्या दिनी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा, वृक्षमित्र सुभेदार बाबुराव पेठकर यांच्या उपस्थितीत सात झाडे लावून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे़ 

जेसीबीने पावसाळ्यापूर्वी ७ हजार ७०० खड्डे खोदून घेण्यात आले आहेत़ अधूनमधून पडणाºया अवकाळीमुळे खड्डे पाण्याने भरणार आहेत आणि या ठिकाणी वृक्षलागवड करणे सोपे होणार आहे़ १ ते ३१ जुलै दरम्यान या २४ एकरावर सर्व झाडे लावली जाणार असून वृक्षलागवडीनंतर ‘ठिबक सिंचन’ द्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे़ याची जबाबदारी सामाजिक संस्था उचलत आहे़ 

स्थानिक प्रजातीची वृक्षलागवड - हवेतील उष्णता कमी करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी आणि भरपूर शुद्ध हवा मिळावी या हेतूने स्थानिक प्रजातीची झाडे लावण्याचा विचार केला गेला आहे़ यामध्ये वड, पिंपळ, बकूळ, गुलमोहर, कडूलिंब अशी स्थानिक प्रकारची झाडे लावली जाणार आहेत़ बाजूला स्मृतिवन आणि समोर हिरवाई असे ग्रीन सोलापूरचे समीकरण अनुभव या उपक्रमातून अनुभवाला येणार आहे़

१ ते ३१ जुलै दरम्यान राज्य सरकार १३ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबवत आहे़ या मोहिमेंतर्गत स्मृती उद्यानासमोरील रेल्वेच्या शिल्लक जागेवर अर्थात ७ हेक्टरवर ७,७०० झाडे लावली जाणार आहेत़ जिल्ह्यातील मोठा उपक्रम राहणार आहे़ - सुवर्णा माने, उपसंचालक, सामाजिक वनीकरण 

रेल्वेच्या रिक्त जागेवर सामाजिक वनीकरणाच्या सहकार्यातून वनराई फुलत आहे़ एकूण रिक्त जागेपैकी जवळपास २४ एकर जागेवर अर्थात ७ हेक्टरवर झाडे लावली जात आहेत़ मध्य रेल्वेने ही जमीन साफ करुन दिली आहे़ खड्डे खोदून तयार आहेत़ - संजय अर्धापुरे, स्टेशन उपप्रबंधक तथा समन्वयक

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेagricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना