शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात रविवारी लसीकरण मोहिम; ४ लाख ५० हजार बालकांना देणार पोलिओ डोस

By appasaheb.patil | Updated: March 2, 2024 16:58 IST

सोलापूर जिल्ह्यात ० ते ५ वयोगटातील ४५ हजार ३४३ बालके असून एकही पाच वर्षाखालील बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

सोलापूर : भारत हा पोलिओ मुक्त देश आहे. मात्र काही देशामध्ये पोलिओ अजूनही आहे.त्यामुळे खबरदारी म्हणून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेंतर्गत ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी जागृत राहून रविवारी ३ मार्च २०२४ रोजी आपल्या बालकांना पोलिओचा डोस आवश्य द्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात ० ते ५ वयोगटातील ४५ हजार ३४३ बालके असून एकही पाच वर्षाखालील बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेची व्यापक प्रमाणात  प्रसिद्धी करण्यात आली आहे.  पल्स पोलिओ डोस पासून एकही बालक वंचित राहू नये याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये ३१२४ लसीकरण केंद्र स्थापन केली असून ५ वर्षे वयोगटापर्यंतील ४५०३४३ बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. पोलिओ लसीकरण करण्यासाठी प्रत्येक गाव पाड्यावर पोहचून लस पाजण्यासाठी १९६ ट्रान्झीट टीम व मोबाईल टीम १३९ कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.७७ आरोग्य वर्धिनी केंद्र व ४२७ उपकेंद्र तसेच ७५११ आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचारी ६०१ पर्यवेक्षक याचे माध्यमातून मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.

पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या दिनाच्या दिवशी डोस देण्यात आला नसेल तर वंचित राहिलेल्या बालकांना गृहभेटी दरम्यान पोलिओ डोस देण्याचा कार्यक्रम ग्रामीण भागात ५ ते ७ मार्च २०२४ (३ दिवस ) शहरी भागात ५ ते ९ मार्च २०२४ (५ दिवस) पर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले व  जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे यानी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर