शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात जुन्या तिकिटांचा वापर; नवे १५ हजार एस. टी. तिकीट यंत्र पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:52 IST

तरीही गाड्या धावू लागल्या : अडचणी आल्या तर जुन्या तिकिटांचा वापर

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात राज्यभरातील एसटी सेवा पूर्ण बंद होती. परिणामी या कालावधीमध्ये मशीनचा वापरही बंद होता सध्या ईटीआय मशीन वापरास सुरू केल्यानंतर मशीन बंद पडण्याच्या तक्रारी वाढत आहेतएस. टी. प्रशासनाला खासगी कंपनीकडून या मशीनचा पुरवठा केला जातो़ राज्यभरात एसटीकडे ३८ हजार ५३३ ईटीआय मशीन

सोलापूर : लॉकडाऊननंतर आगारातच बंदिस्त असलेल्या एस. टी. गाड्या चांगल्याच धावू लागल्या आहेत; मात्र तांत्रिक अडचणीमुळे तिकीट मशीन (ईटीआय) बंद पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. राज्यात १५ हजार तिकीट यंत्रे बंद असून, काही मार्गांवर वाहक जुन्या तिकिटांचा वापर करुन प्रवाशांना सेवा देत असल्याची माहिती राहुल तोरो, राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) चे राहूल तोरो यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

लॉकडाऊन काळात राज्यभरातील एसटी सेवा पूर्ण बंद होती. परिणामी या कालावधीमध्ये मशीनचा वापरही बंद होता़ सध्या ईटीआय मशीन वापरास सुरू केल्यानंतर मशीन बंद पडण्याच्या तक्रारी वाढत आहेत़ एस. टी. प्रशासनाला खासगी कंपनीकडून या मशीनचा पुरवठा केला जातो़ राज्यभरात एसटीकडे ३८ हजार ५३३ ईटीआय मशीन असून त्यातील १५ हजार ३७ मशीन नादुरुस्त झाल्याच्या तक्रारी महामंडळाकडे आलेल्या आहेत़ नादुरुस्त मशीन पैकी पाच हजारांपेक्षा जास्त मशीन हे दुरुस्त करून महामंडळाला देण्यात आल्या आहेत.

सध्या अनेक विभागात पूर्ण क्षमतेने फेºया सुरू झालेल्या नाहीत. यामुळे ईटीआय मशीनची कमतरता भासत नाही़ पण अचानक मशीन बंद पडल्याने वाहकांना मात्र मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे़ तिकीट लवकर न येणे, मशीन हँग होणे, चार्जिंग लवकर उतरणे, कोणतेही बटन दाबल्यास ठराविक बटन दाबले जाणे, कार्ड रिड होण्यास विलंब लागणे अशा अनेक समस्या वाहकांना येत आहेत़गेल्या अनेक दिवसांपासून मशीन वापरात नसल्याने अडचणी येत होत्या़ पण कोणत्याही विभागात मशीनमुळे काम बंद पडले नाही़ गेल्या दोन दिवसांमध्ये तीन-चार हजार मशीन हे बदलण्यात आले आहेत़ सध्या जवळपास १० ते १५ टक्के मशीन दुरूस्त करण्याचे काम करण्यात येत आहे.

- राहुल तोरो, महाव्यवस्थापक, वाहतूक

टॅग्स :SolapurसोलापूरST Strikeएसटी संपBus DriverबसचालकGovernmentसरकार