शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

बंदी असताना प्लास्टिकचा वापर; सोलापुरातील चार व्यावसायिकांवर महापालिकेची कारवाई

By appasaheb.patil | Updated: April 21, 2023 17:02 IST

सोलापूर : प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध १६७ आस्थापनांची तपासणी करून चार व्यवसायधारकांवर ...

सोलापूर : प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध १६७ आस्थापनांची तपासणी करून चार व्यवसायधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून एकूण ५८ किलो प्लास्टिक गुरुवारी जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिली.

महापालिका आयुक्त शितल तेली - उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षकांनी सोलापूर शहरात विविध १६७ दुकानांची तपासणी केली. शहरातील काळी मशीद परिसर, सुपर मार्केट, एसटी स्टँड, सिद्धेश्वर मार्केट यार्ड,  कोंत्तम चौक, ७० फूट रोड परिसर, आसरा चौक, सैफुल, मरीआई चौक, विजापूर रोड, मधला मारुती, फुलारी गल्ली, अशोक चौक आदी परिसरातील दुकानांची , व्यवसायधारकांची तपासणी करण्यात आली.  यामध्ये सिद्धेश्वर मार्केट यार्ड, कोंत्तम चौक, मधला मारुती फुलारी गल्ली, अशोक चौक परिसरातील चार व्यवसाय धारकांवर प्रत्येकी पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करून एकूण २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे तर एकूण 58 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. या मोहिमेत आरोग्य निरीक्षक सूर्यकांत लोखंडे, नडीमेटला, केदारनाथ गोटे, तमशेट्टी, इंगळे, नागटिळक, अन्वर शेख, नल्लामंदू आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :Solapurसोलापूर