शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; बरूरच्या बीएसएफ संकुलाचा रुग्ण विलगीकरणासाठी वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 12:17 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सज्ज; तीन वर्षे पडून होती प्रशिक्षण केंद्राची इमारत

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी खबरदारी बीएसएफ प्रशिक्षण केंद्राच्या सुसज्ज इमारतीत वीज, पाणी आणि रस्ते अशा सर्व सुविधा तब्बल ३०० रुग्णांची विलगीकरणाची सोय होणार

सोलापूर : बांधकाम पूर्ण होऊनही बंद अवस्थेत राहिलेल्या बरूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील बीएसएफ कॅम्पच्या इमारतीमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. ही इमारत तीन वर्षांपासून वापराविना पडून आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप परिसरात राहणाºया नागरिकांना कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावापासून अलिप्त ठेवण्यासाठी प्रशासन विविध मार्गांचा अवलंब करीत आहे. मंद्रुप पोलीस कार्यक्षेत्रातील गावामध्ये नियमितपणे गस्त घालत आहेत. नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. अपर तहसील कार्यालयात परिस्थितीची दैनंदिन माहिती घेतली जात आहे.

अतिरिक्त तहसीलदार उज्ज्वला सोरटे या महसूल यंत्रणेच्या मदतीने गावोगावी जनजागृती करण्याच्या उपक्रमांना प्रोत्साहन देत आहेत. आगामी काळात कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी मंद्रुपच्या ग्रामीण आरोग्य रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयात विलगीकरणासाठी स्वतंत्र १० बेड तयार ठेवण्यात आले आहेत. वैद्यकीय उपचाराची साधने व उपलब्ध साधनांचा आढावा घेण्यात आला. अन्य आवश्यक सुविधा ग्रामीण रुग्णालयात तातडीने पुरवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. 

सोलापूर विभागाच्या उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील-नाईकडे यांच्या उपस्थितीत मंद्रुप परिसरातील नागरिकांना कोरोना व्हायरसपासून सुरक्षित ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या ग्रामस्तरीय समित्यांची बैठक घेऊन स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या़ गावचे तलाठी याकामी समन्वयाची भूमिका बजावतील, असे त्यांनी स्पष्ट केले.कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांचे विलगीकरण करण्यासाठी बरुर येथील सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची पाहणी सोलापूर उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील-नाईकडे, अपर तहसीलदार उज्ज्वला सोरटे, मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी केली. ही इमारत सुसज्ज असून, तिची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले . 

३०० बेडसची होईल सोय- बीएसएफ प्रशिक्षण केंद्राच्या सुसज्ज इमारतीत वीज, पाणी आणि रस्ते अशा सर्व सुविधा आहेत़ याठिकाणी असलेल्या निवासी गाळ्यात  ( फ्लॅट्स) तब्बल ३०० रुग्णांची विलगीकरणाची सोय होणार आहे . आरोग्य, महसूल आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रितपणे इमारतीची विलगीकरणासाठी निवड केलेली आहे.

टोलेजंग इमारती रिकाम्याच- केंद्रीय सुरक्षा बलाने सीमा सुरक्षा बलाच्या जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी ६ वर्षांपूर्वी भूसंपादन करून इमारत बांधणीचे काम हाती घेतले होते़ तीन वर्षांत इमारत बांधून पूर्ण झाली़ जागेभोवती संरक्षक भिंत बांधण्यात आली़ या ठिकाणी सात बहुमजली टोलेजंग इमारती आहेत़ त्यात जवळपास ४८ निवासी गाळे (फ्लॅट्स) आहेत़ सध्या या इमारती रिकाम्याच आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी खबरदारी घेत आहोत़ नागरिकांचाही प्रतिसाद चांगला आहे़ संशयित रुग्णांच्या विलगीकरणाची आवश्यकता भासल्यास बरूर येथील बीएसएफ सेंटर निश्चित करण्यात आले आहे़-संदीप धांडे, सपोनि, मंद्रुप पोलीस ठाणे 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBSFसीमा सुरक्षा दल