शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

तपास न लागलेल्या खून व दरोड्याचा पुन्हा तपास होणार; पोलीस अधीक्षकांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 08:34 IST

मंगळवेढ्यात पोलीस उपअधीक्षक कार्यालयाची वार्षिक तपासणी

मंगळवेढा : स्थानिक पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास करून मंगळवेढयातील दरोडा व सांगोल्यातील खुनाचा तपास काही महिन्यांनंतर लागलेला नाही. गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने गुन्हेगार हे मोकाट आहेत. त्यामुळे या दरोडा व खूनाचा तपास करून आरोपीला जेरबंद करण्याची जबाबदारी आता एका स्वतंत्र टीमकडे देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिली.

मंगळवेढा येथे डीवायएसपी कार्यालयाच्या वार्षिक तपासणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलीस अधीक्षक म्हणून तेजस्विनी सातपुते रुजू झाल्यानंतर त्यांनी प्रशासनात अनेक बदल केले. या बदलामुळे पोलिसांचे कामकाज अधिक गतिमान झाले आहे. सातपुते यांनी प्रलंबित गुन्हे निकाली काढण्याबरोबर शिक्षेचे प्रमाण वाढावे यावर भर दिला आहे. मंगळवेढा व सांगोला या पोलिस स्टेशनच्या गुन्हे पेन्डन्सीचे प्रमाण ४०  ते ४५  टक्के असून  ते २५  ते ३०  टक्के पर्यत खाली आले पाहिजे असे त्यांनी सूचित केले.

मंगळवेढा शहरालगत असलेल्या संजय हजारे यांच्या बंगल्यावर मागील दीड महिन्यापुर्वी दरोडा पडला होता.या दरोडयाचा तपास व सांगोला येथील प्रलंबीत खून प्रकरण या दोन्ही घटनेचा तपास लावणेकामी स्वतंत्र टिम तयार करून त्याचा छडा लावण्याच्या सूचना यावेळी दोन्ही पोलिस निरिक्षकांना करण्यात आल्या.मंगळवेढा येथील नवीन डीवायएसपी कार्यालयाचे बांधकाम अंतीम टप्प्यात असून किरकोळ कामे निधीअभावी रखडली आहेत. निधीसाठी पोलिस अधिक्षक सातपुते  यांनी थेट जिल्हाधिकाऱ्याशी मोबाईल वरून चर्चा केली. या दरम्यान त्यांनी निधी देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. बांधकाम पूर्ण  होताच डी.वाय.एस.पी.कार्यालय  स्थलांतरीत केले जाईल असे सातपुते यांनी सांगितले. नेहमी दामाजी चौकात मोठया प्रमाणात गर्दी असते.परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सातपुते यांनी अवजड वाहतूक बंद करण्याच्या  सूचना केल्या.

सध्या शाळा, कॉलेज सुरु झाल्यामुळे  छेडछाडीच्या घटनांना लगाम लावण्यासाठी  दामिनी पथकाने    आलेल्या तक्रारीवर समुपदेशन व कारवाईही  करावी . ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत व ग्रामसुरक्षा पथकाव्दारे चोरी,अपहरण यासारख्या घटनेतील गुन्हेगार  पकडण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेला यश येत आहे. अपहरण घटनेतील मुले-मुलीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस