शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पणजोबांनी वकिली केलेले न्यायालय पाहण्यासाठी ती आली अमेरिकेतून सोलापुरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 14:21 IST

सोलापूर : आपल्या पणजोबांनी ज्या न्यायालयात वकिली केली ते सोलापूर जिल्हा न्यायालय पाहण्यासाठी ती अमेरिकेतून सोलापुरात आली. अनशा भारत ...

ठळक मुद्देअनशा ही अमेरिकेत सध्या नववीत शिकत आहे, तिचे पणजोबा कै. अण्णासाहेब तथा ए. तु. माने हे सोलापूर जिल्ह्यातील नामवंत वकील होतेजेथे तिच्या पणजोबांनी वकिली केली ते न्यायालय बघण्यासाठी ती आई-वडिलांबरोबर हट्ट करून भारतात आली

सोलापूर : आपल्या पणजोबांनी ज्या न्यायालयात वकिली केली ते सोलापूर जिल्हा न्यायालय पाहण्यासाठी ती अमेरिकेतून सोलापुरात आली. अनशा भारत साळोखे असे तिचे नाव आहे.

अनशा ही अमेरिकेत सध्या नववीत शिकत आहे. तिचे पणजोबा कै. अण्णासाहेब तथा ए. तु. माने हे सोलापूर जिल्ह्यातील नामवंत वकील होते. जेथे तिच्या पणजोबांनी वकिली केली ते न्यायालय बघण्यासाठी ती आई-वडिलांबरोबर हट्ट करून भारतात आली. कारण तिलादेखील अमेरिकेत वकील व्हायचे आहे. तिची आई गीतांजली व वडील भारत साळोखे हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. दोघेही न्यूयॉर्कजवळील प्रिंगस्टन शहरात राहतात. अनशा हिचा जन्म अमेरिकेत झाला आहे. भारतीय संस्कृती व आजोळविषयी तिला कमालीचे औत्सुक आहे. 

अमेरिकेत वकिलीची परीक्षा फार अवघड आहे. भारतीय वंशाच्या एका महिलेने वकिली करीत न्यायाधीश पदापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे लहानपणापासून तिने वकील होण्याचे ध्येय ठेवले असून त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. तिचे आजोबा ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, मामा अ‍ॅड. जयदीप माने  तर तिची आजी रेखा माने या आहेत. आजीचे वडील कै. वसंतराव दळवी हे देखील कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत वकील होते. ज्या ठिकाणी आपल्या सर्व पूर्वजांनी वकिली केली ते न्यायालय बघण्याची तिला खूप इच्छा असल्याने शुक्रवारी ती सोलापूर न्यायालयात आली होती. 

आजोबांकडून माहिती...- शुक्रवारी अ‍ॅड. धनंजय माने यांचे बार्शी न्यायालयात कामकाज होते. तेथून आल्यावर अनशा हिने जिल्हा न्यायालयात जाण्याचा हट्ट धरला. त्यामुळे अ‍ॅड. धनंजय माने यांनी तिला न्यायालयात नेले, न्यायालयाची भव्य इमारत, आतील न्यायकक्ष, सरकारी वकील चेंबर, वकिलांचे चेंबर व परिसर दाखविला. माझ्या आजोबांनी याच न्यायालयात युक्तिवाद केला का असे तिने प्रश्न उपस्थित केले. समोर भेटलेल्या वकिलांनाही तिने संवाद साधला. 

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयAmericaअमेरिका