शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात साेलापुरात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 12:21 IST

विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सोलापूर - पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढी विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे  कार्याध्यक्षा आमदार प्राणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  सोलापुरात युवक काँग्रेसच्यावतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. याचवेळी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. विनापरवानगी आंदोलन केल्यामुळे कार्यकर्त्यांना पोलिसानी ताब्यात घेतले.

गेल्या 7 वर्षांपासून पेट्रोल, डिझेल व गॅस ची दरवाढ हे केंद्र सरकार सत्यत्याने करत असून याचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. जवळ जवळ 25 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने या वाढीमधून गोळा केले आहेत याचा परिणाम महागाई वाढी मध्ये झाला आहे. विशेषतः आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेलाचे भाव कमी असतानासुद्धा सातत्याने ही भाववाढ नागरिकांना लादली जात असून याचा निषेध आम्ही व्यक्त करतो व ही दरवाढ त्यांनी मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

शहरात युवक काँग्रेसच्यावतीने अंबादास करगुळे, विनोद भोसले, सुमित भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनी महागाईविरोधात आंदोलन करून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले. यावेळी परिवहन सदस्य तिरुपती पार्किपांडला, रुपेश गायकवाड, कुणाल घोडके, शाहू सलगर, बसवराज कोळी, सुभाष वाघमारे, इम्रान गढवाल, सिद्धू कोरे, बलभीम चव्हाण, जलील शेख,नितीन जमदाडे, रोहित भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूरcongressकाँग्रेसPetrolपेट्रोलPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकार