शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योगास उभारी देण्यासाठी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचा ऑक्टोबरमध्ये सोलापूर दौरा

By appasaheb.patil | Updated: August 3, 2022 22:47 IST

खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली माहिती

सोलापूर : सोलापूरवस्त्रोद्योग क्षेत्रात जगप्रसिद्ध असून सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच सोलापुरातील टेक्सटाइल व गारमेंट उद्योगास उभारी देण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योमंत्री पियूष गोयल येत्या ऑक्टोबर महिन्यात सोलापूर दौरा करणार असल्याची माहिती खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली. संसदीय अधिवेशन काळात संसदेत खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी भेट घेतली. यावेळी महेंद्र जैन, उद्योग व्यापार आघाडीचे श्रीनिवास दायमा उपस्थित होते. 

या भेटीवेळी खा. डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सोलापुरातील हॅण्डलूम, पॉवरलुम, गारमेंट क्षेत्रातील चढ, उतार व कामगारांच्या समस्या संबंधित केंद्रीय वस्त्रोद्योमंत्री पियूष गोयल यांना सविस्तर माहिती दिली. तसेच सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण दिले. या एकदिवसीय दौऱ्यात सोलापुरातील वस्त्रोद्योगास भेट, उद्योजकांच्या भेटी घेणे त्यानंतर आयोजित मेळाव्यात सोलापुरातील उद्योजकांना केंद्र सरकारच्या धोरणांची, योजनांची माहितीपर व्याख्यान देणे असे स्वरूप असणार आहे. याद्वारे सोलापूरच्या वस्त्रनिर्मिती क्षेत्रास उभारी मिळेल असे खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सांगितले. 

त्यांनतर केंद्रीय वस्त्रोद्योमंत्री पियूष गोयल यांनी हे निमंत्रण स्विकारून येत्या ऑक्टोबर महिन्यात सोलापूर दौरा करणार असल्याची माहिती दिली. यामुळे सोलापूरला नक्कीच उज्वल संधी मिळण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून प्रत्यक्ष केंद्रीय मंत्री सोलापुरात मार्गदर्शन करून उभारी देणार असल्याने हा दौरा नक्कीच फलदायी असणार असल्याची माहिती खा. डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात वस्त्रउद्योजकांसह पूर्वतयारी बैठक घेणार असल्याचेही  खा. डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सांगितले.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलSolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योग