शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरच्या सिध्देश्वर तलावात बुडून अज्ञात इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 12:47 IST

सिद्धेश्वर तलावातील मृत्यूचे सत्र सुरूच; सुरक्षारक्षक नसल्याने वारंवार घडतात घटना

ठळक मुद्देसिद्धेश्वर तलावातील गणपती घाटाजवळ, गणेश विसर्जन कुंडाच्या बाजूला असलेल्या पाण्यात मृत्यूचे सत्र सुरूचसुरक्षारक्षक नसल्याने वारंवार अशा घटना घडत असून, गुरुवारी पाण्यात अज्ञात इसमाचे प्रेत तरंगताना आढळून आलेगेल्या महिन्यात याच ठिकाणी निखिल उगाडे आणि सौरभ सरवदे या रविवार पेठेतील दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता

सोलापूर : सिद्धेश्वर तलावातील गणपती घाटाजवळ, गणेश विसर्जन कुंडाच्या बाजूला असलेल्या पाण्यात मृत्यूचे सत्र सुरूच आहे. सुरक्षारक्षक नसल्याने वारंवार अशा घटना घडत असून, गुरुवारी पाण्यात अज्ञात इसमाचे प्रेत तरंगताना आढळून आले. गेल्या महिन्यात याच ठिकाणी निखिल उगाडे आणि सौरभ सरवदे या रविवार पेठेतील दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता.गुरुवारी दुपारी १२ वाजता तलावातील पाण्यात अज्ञात इसमाचे प्रेत तरंगताना दिसून आले. बघणाºया लोकांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन राठोड यांना फोन करून याची माहिती दिली. 

सचिन राठोड यांनी प्रेताची पाहणी करून तत्काळ फौजदार चावडी पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी येऊन पाहणी केली, अ‍ॅम्ब्युलन्सला बोलावून घेतले. स्थानिक तरुणाच्या सहायाने व तलावाची स्वच्छता करणाºया कामगारांच्या मदतीने प्रेतास बाहेर काढण्यात आले. प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. पाण्यावर तरंगणारे प्रेत पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. गणपती घाटाच्या बाजूला असलेले पाणी खोल असून त्यात आजवर अनेक लोक मरण पावले आहेत. 

दिवे, कॅमेरे बसवावेत- कुरेशी- रात्री अनेक लोक गणपती घाटाच्या परिसरात बसतात. काही लोक मद्यपान करतात, या प्रकाराला कोणी आवर घालत नाही. ८ ते १५ दिवसात १ ते २ प्रेत या पाण्यात तरंगताना दिसतात. सुरक्षा व्यवस्था नसल्याने रात्री कोण येतं आणि जातं याचा अंदाज येत नाही. या भागात तलाव दिसेल अशा पद्धतीने मोठे लाईट दिवे लावण्यात यावेत. सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यास पाण्यात पडून मरणाºयांची आत्महत्या आहे की आणखी काही प्रकार या ठिकाणी होतो हे लक्षात येईल. सुरक्षेच्या दृष्टीने गणपती घाटावर एक सुरक्षारक्षक नेमण्यात यावा अशी मागणी स्थानिक रहिवासी निहाजअहमद कुरेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. 

आजवर अनेक प्रेते बाहेर काढली, मला पोहता येत नाही. पोलिसांच्या विनंतीवरून मी नावेच्या सहायाने पाण्यात जातो, प्रेताला धरून बाहेर ओढत आणतो. पूर्वी तलाव पूर्ण भरलेला होता तेव्हाही अशीच स्थिती होती. आता डबक्याच्या स्वरूपात असलेल्या पाण्यातही तीच स्थिती आहे. -संजय फुलारे, स्थानिक रहिवासी.

महिन्यातून ४ ते ५ घटनेसाठी मला स्थानिक लोकांकडून फोन येत असतो, पाहणी करून मी पोलिसांना माहिती देत असतो. रात्री-अपरात्री या भागात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे, याला आळा घालण्यासाठी या ठिकाणी २४ तास सिक्युरिटी गार्ड नेमणे गरजेचे आहे. शिवाय या परिसरात फिरण्यासाठी व बसण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांनाही मोठा त्रास होत असतो. टपोºया मुलांमुळे गणपती मंदिरात दर्शनासाठी येणाºया लोकांनाही त्रास होतो. -सचिन राठोड, सामाजिक कार्यकर्ता.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसriverनदी