शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अन...अफवेचा बळी होता होता तो वाचला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 12:15 IST

सोलापूर शहर पोलिसांची सतर्कता : तामिळनाडूच्या इसमास सुखरुप पाठविले

ठळक मुद्दे सोलापूर शहर पोलिसांची सतर्कता तामिळनाडूच्या इसमास सुखरुप पाठविले

सोलापूर : अनोळखी इसमाला मुले पळविणाºया टोळीतील समजून बेदम मारहाण करण्याच्या घटना सर्वत्र घडत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पाच जणांना धुळे येथे ठार मारण्यात आले. असाच प्रकार सोलापुरात घडला असून पोलिसांच्या समयसूचकतेमुळे एका तरुणाचा बळी जाता जाता वाचला.

दहिटणे परिसरात मागील दोन दिवसांपासून तामिळनाडूचा एक इसम फिरत होता, नागरिकांनी रमेश अंगप्पन (रा. गांधी रोड, मंजकट्टु, मोडाकुर्ची, रा. तामिळनाडू) याला जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात घेऊन आले. पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता तो तामिळनाडूचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तो तीन  आठवड्यांपासून बेपत्ता होता, सोलापूर पोलिसांनी त्या इसमास तामिळनाडू  पोलिसांच्या हवाली केले.

संजय जगताप व महेश शिमगी या दोघांनी रमेशला जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात घेऊन आले.  सोलापूर पोलिसांनी तमीळ भाषा येणाºया ड्रायव्हरला ठाण्यात बोलावले.  त्यानंतर त्या ड्रायव्हरने रमेशकडे विचारपूस केली असता, त्याने त्याचे नाव रमेश असे सांगितले. तसेच त्याच्याकडून नातेवाईकांची माहिती घेऊन सोलापूर पोलिसांनी  संपर्क केला असता, त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तो तीन आठवड्यांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले.

मोडाकुर्ची  पोलीस ठाण्यात रमेश मिसिंग असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी नोंदविली आहे. पोलिसांनी रमेशवर सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार करून त्याच्या मुलासोबत त्याला आज तामिळनाडूला पाठविले असल्याचे पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी सांगितले. पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, सहायक पोलीस आयुक्त दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पो.नि. यशवंत केडगे, पो. नि. राजेंद्र बहिरट आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

अनुचित प्रकार घडला नाहीमहाराष्ट्रात लहान  मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याबाबत  सोलापूर शहरात अफवा पसरली असताना, त्यावरुन वेगवेगळ्या भागात अनुचित घटना घडलेल्या आहेत,  दहिटणे परिसरातील सतर्क नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या जनजागृती मोहिमेच्या प्रभावामुळे  त्याला पोलीस ठाण्यात घेऊन आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस