शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बायपासऐवजी टेंभुर्णी गावातून टाकणार उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 13:21 IST

नवा प्रस्ताव : शेतकºयांनी केला होता विरोध, आता केवळ एका गावचे भूमापन बाकी

ठळक मुद्देउजनी ते सोलापूर पहिली जलवाहिनी रस्त्याच्या उजव्या बाजूने टाकण्यात आलीनवी जलवाहिनी बायपास रोडच्या बाजूने घेण्याचा प्रस्ताव होताबायपास रोडच्या कामात शेतकºयांचे, दुकानदारांचे मोठे नुकसान झाले

सोलापूर : उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी टेंभुर्णी बायपासऐवजी टेंभुर्णी गावातून जाणाºया रस्त्यालगत टाकण्यात येणार आहे. यामुळे या कामात एक ते सव्वा कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे सोलापूर डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन कंपनीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

उजनी ते सोलापूर पहिली जलवाहिनी रस्त्याच्या उजव्या बाजूने टाकण्यात आली. नवी जलवाहिनी बायपास रोडच्या बाजूने घेण्याचा प्रस्ताव होता. बायपास रोडच्या कामात शेतकºयांचे, दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. जलवाहिनीच्या कामामुळे पुन्हा शेतकºयांचे नुकसान होईल. त्यामुळे ही जलवाहिनी इतरत्र वळवण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकºयांनी केली होती. आमदार संजय शिंदे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मनपा, स्मार्ट सिटीच्या अधिकाºयांसोबत बैठकही झाली होती. त्यानंतर ही जलवाहिनी टेंभुर्णी गावातून रस्त्याच्या दुसºया बाजूने टाकण्याचा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाने तयार केला. नव्या प्रस्तावामुळे ४०० मीटरचे अंतर कमी होईल. पाईपलाईनच्या कामात सुमारे एक कोटी रुपये आणि भूसंपादनाच्या कामातही २० ते २५ लाख रुपयांची बचत होणार आहे.----

नुकसानभरपाईचा प्रस्ताव लवकरचसमांतर जलवाहिनीची वर्कआॅर्डर आॅगस्ट २०१९ मध्ये देण्यात आली. वर्कआॅर्डर देण्यापूर्वी महापालिका, स्मार्ट सिटीच्या अधिकाºयांनी भूसंपादनाचे काम पूर्ण करुन घेणे अपेक्षित होते. परंतु, याकडे दुर्लक्ष करुन थेट वर्कआॅर्डर देण्यात आली. ढेंगळे-पाटील यांनी भूसंपादनाच्या उर्वरित कामांना गती दिली. सध्या केवळ टेंभुर्णी गावातील मोजणीचे काम शिल्लक आहे. नुकसानभरपाईच्या मूल्यांकनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर होणार आहे.

----पाईपलाईनच्या कामावर दृष्टिक्षेप

  • उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी - ११० किमी लांबी
  • एकूण ३६ गावातील गटांचे तात्पुरते भूसंपादन
  • तीन ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग
  • दोन ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रॉसिंग
  • एका ठिकाणी सीना नदी क्रॉसिंग
  • आठ ठिकाणी राज्य महामार्ग क्रॉसिंग
  • ६० ठिकाणी जिल्हा, ग्रामीण, इतर मार्गांचे क्रॉसिंग
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटीUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूक