शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

विश्वविक्रमासाठी दोन हजार सोलापूरकरांची टॉवेल साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:17 IST

विक्रमाचा निकाल आठवड्याने समजणार : तळपत्या उन्हात शहरवासीय आले एकत्र

ठळक मुद्देव्हायब्रंट टेरी टॉवेलच्या माध्यमातून शहराचे नाव जगभर पोहोचविण्यासाठी सोलापूरकरांनी उन्हाचीही तमा बाळगली नाहीसकाळी आठ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत २ हजार ४९ लोक उभे राहात टॉवेलच्या साखळीने आपल्यातल्या एकतेचा प्रत्यय दिलाटेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

सोलापूर : व्हायब्रंट टेरी टॉवेलच्या माध्यमातून शहराचे नाव जगभर पोहोचविण्यासाठी सोलापूरकरांनी उन्हाचीही तमा बाळगली नाही. सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत २ हजार ४९ लोक उभे राहात टॉवेलच्या साखळीने आपल्यातल्या एकतेचा प्रत्यय दिला. विश्वविक्रमाची नोंद करण्यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विक्रमाच्या नोंदीचा निकाल आठ दिवसानंतर कळणार आहे.

प्रत्येकाने केलेला पांढºया रंगाचा पेहराव, हातामध्ये पांढºया रंगाचा टॉवेल, जागोजागी उभे राहून पाणी व नाष्टा पुरविणारे स्वयंसेवक, कानावर पडणाºया  सूत्रसंचालकांच्या सूचना, मधूनच वाजविण्यात येणारे संगीत व ठेका धरायला लावणारी देशभक्तीपर गीते, उत्साह वाढवणाºया क विता व शायरी अशा वातावरणात लिंगराज वल्याळ मैदानावर मानवी साखळीचा उपक्रम घेण्यात आला. सर्वांच्या मनात एकच भावना होती ती म्हणजे सोलापूरच्या नावे विश्वविक्रम व्हावा.

शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून मैदानाकडे अनेकांची पाऊले जात होती. जसजसा वेळ पुढे जात होता तशी उन्हाची तीव्रता वाढत होती. घामाच्या धाराही येत होत्या; मात्र हार मानणार तो सोलापूरकर कसा या भावनेने तब्बल चार तास मैदानावर घालविले. मागील सात दिवसांपासून स्वयंसेवक या उपक्रमाची तयारी करत होते. मैदानावर थांबलेल्या सोलापूरकरांची स्वयंसेवकांनी काळजी घेतली. गिनीज बुकच्या नियमानुसार कशा पद्धतीने थांबावे, व्हिडीओच्या माध्यमातून गणना होत असताना काय करावे अशा सूचना स्वयंसेवकांनी दिल्या. मानवी साखळीत सहभागी झालेल्यांचा उत्साह वाढविण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. चहा-पाण्याची व्यवस्था करण्यापासून भोवळ आलेल्यांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. उपक्रमाची निर्धारित वेळ पूर्ण झाल्यानंतर मैदानावर त्यांनी जल्लोष केला.

प्रत्येक सहभागींच्या हातावर एक बँड बांधण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येकाला एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला होता. मैदानात पावसाचे पाणी, चिखल असूनही नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. महापौर शोभा बनशेट्टी, नगरसेविका रामेश्वरी बिर्रु, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बाळासाहेब यशवंते, टीडीएफचे अध्यक्ष राजेश गोसकी यांची या उपक्रमाला उपस्थिती होती.

 सध्या इटलीच्या नावे विक्रम- २०१५ मध्ये इटलीमध्ये लोंगेस्ट ह्यूमन टॉवेल चेनचा विश्वविक्रम करण्यात आला होता. या विक्रमात एक हजार ६४६ माणसांनी टॉवेल पकडून मानवी साखळी केली होती. सोलापूर हे टेरी टॉवेल उत्पादनात सुप्रसिद्ध आहे. जागतिक स्तरावर याची नोंद व्हावी यासाठी अगोदरच्या रेकॉर्डपेक्षा अधिक फरकाने टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन आयोजित तीन हजार माणसांची टॉवेल साखळी करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परीक्षणासाठी ड्रोन कॅमेºयाचा वापर करण्यात आला. या उपक्रमात २ हजार ४९ लोक सहभागी झाल्याने हा विक्रम मोडेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योग