शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आजारी वडिलांसाठी औषध घेऊन परतताना कार अपघातात दोघे ठार

By काशिनाथ वाघमारे | Updated: June 30, 2023 22:55 IST

दोघेजण गंभीर जखमी : दिघंची- महूद रोडवरील कटफळ शिवारात अपघात

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : आजारी वडिलांसाठी हुबळी येथून औषध घेऊन घराकडे परत येताना भरधाव कार उलटून मुलासह त्याच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात इतर दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.

दत्ता पोपट घोलप (३४ रा. राऊत नगर, अकलूज) व श्याम उमाकांत गायकवाड (३३ रा. मटन मार्केट, अकलूज ता. माळशिरस) अशी मृतांची नावे असून शुक्रवार, ३० जून रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास सांगोला तालुक्यात महूद- दिघंची रोडवर कटफळ फॉरेस्ट जवळ हा अपघात घडला. या अपघातात महावीर बाळासाहेब भोसले (३२) व बबलू पंडित चुनाडे (दोघेही रा.अकलूज) हे दोघे जखमी झाले असून याबाबत विकी दिलीप घोलप (रा. राऊत नगर, अकलूज) यांनी पोलिसात खबर दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार दत्ता घोलप हा आजारी वडिलांसाठी औषध आणण्यासाठी मित्र श्याम गायकवाड, महावीर भोसले व बबलू चुनाडे असे चौघेजण मिळून अकलूज येथून २८ जून रोजी स्वत:च्या कार(एम.एच. ४५ / ए. एल. १२०८) मधून हुबळी जिल्ह्यात धारवाड (कर्नाटक) येथे गेले होते. औषध घेतल्यानंतर २९ जून रोजी चौघेजण आदमापूर येथे गेले. त्याठिकाणी संत बाळूमामाचे देवदर्शन घेऊन पुढे सायंकाळी अकलूजकडे निघाले. त्यांची कार शुक्रवार, ३० जून रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास दिघंचीहून - महूद रोडने निघालेली असताना सांगोला तालुक्यात कटफळ शिवारात फॉरेस्ट जवळ चालकाचा कारवरील  ताबा सुटला. अपघातात कार रस्त्याच्या कडेला तीन-चार वेळा उलटली. अपघातात दत्ता घोलप व श्याम गायकवाड या दोघांच्या डोकीस गंभीर मार लागून  जागीच मरण पावले तर दोघेजण जखमी झाले. नातेवाईकांनी घेतली धाव

दरम्यान, घटनास्थळावरून अनोखळी व्यक्तींनी जखमी बबलू चुनाडे यांच्या घरी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली अन जखमींना तातडीने आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. तेथे दोघांवर प्राथमिक उपचार करून नातेवाईकांनी धाव घेत पुढील उपचाराकरता अकलूज येथे खाजगी रुग्णालयात हलवले. तसेच दत्ता घोलप व श्याम गायकवाड यांचे सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर