शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

सोलापूर जिल्हा बँकेत एका दिवसात  जमा झाल्या दोन कोटींच्या ठेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 13:27 IST

वैराग शाखेचा विक्रम: सर्वाधिक २५ लाख रुपयांच्या ठेवी जमा

ठळक मुद्देजिल्हाभरातील २१९ शाखांमध्ये ठेवी ठेवण्यासाठी कर्मचाºयांनीच पुढाकार घेतला मुख्यालयातील अनेक कर्मचाºयांनी ठेवी  व बचत खाती सुरू केलीजिल्हा बँक थकबाकीमुळे अडचणीत आली होती

सोलापूर: बँक कर्मचारी व सचिवांनीच पुढाकार घेतल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेत गुरुवारी एकाच दिवसात दोन कोटींपेक्षा अधिक ठेवी जमा झाल्या. बँकेच्या शतक महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त ३० मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणावर ठेवी वाढतील असे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले.

बँकेच्या मुख्यालयासह जिल्हाभरातील २१९ शाखांमध्ये ठेवी ठेवण्यासाठी कर्मचाºयांनीच पुढाकार घेतला असल्याचे बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी सांगितले. कर्मचारी व विकास सोसायट्यांच्या सचिवांनी स्वत:च्या  कुटुंबातील महिला, सुना, मुले व नातेवाईकांच्या नावाने ठेवी ठेवाव्यात तसेच बचत खाती उघडावीत असे कर्मचाºयांनीच आवाहन केले.

८ मार्च महिला दिन तसेच बँकेने शतक पूर्ण केल्याने गुरुवारी सर्वच शाखात ठेवी ठेवणे व बचत खाती उघडण्याचे काम दिवसभर सुरू होते. बँकेच्या मुख्यालयात सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी कुटुंबातील चौघांच्या नावे बचत खाती उघडली. मुख्यालयातील अनेक कर्मचाºयांनी ठेवी  व बचत खाती सुरू केली. वैराग शाखेत २५ लाख रुपयांच्या ठेवी जमा केल्या, बार्शी मार्केट यार्ड शाखा, पेनूर शाखा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्याचे सांगण्यात आले. 

जिल्हा बँक थकबाकीमुळे अडचणीत आली होती. वसुलीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत, कर्जमाफीमुळे बºयापैकी शेतकºयांकडील वसुली होणार असल्याने शेतकºयांना नव्याने कर्ज वाटप होणे गरजेचे आहे. बँक आता नव्या जोमाने कर्ज वाटप करणार असल्याने त्यासाठी पैशाची गरज असल्याने ठेवी वाढविण्याचे कर्मचाºयांनीच मनावर घेतल्याचे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले.  बँकेचा शतक महोत्सवी वर्धापन दिन कार्यक्रम ३० मार्चला होणार असून तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर ठेवी वाढतील असे त्यांनी सांगितले. यापुढेही ठेवी व बचत खाती उघडण्याचे काम सुरू राहील असे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय