शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करीत गुंतलेल्या दोन बोटी सोलापुरच्या महसूल विभागाने जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 20:32 IST

भीमा नदी पात्रात झाली; कारवाई दोन बोटी पळून जाण्यात यशस्वी

ठळक मुद्देअक्कलकोट तहसील कार्यालयात वाळू तस्करी विरोधी पथकदोन बोटी कर्नाटक हद्दीत गेल्या पळून

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील शेगाव येथील भीमानदी पात्रातून वाळू उपसा करणाºया दोन बोटी सोलापूरच्या महसूल विभागाने शनिवारी जाळल्या.

महसूल अधिकारी, दक्षिण तालुका व अक्कलकोट तालुक्यातील कर्मचारी यांच्या संयुक्त पथकने ही कारवाई केली. ही कारवाई लक्षात येताच दोन बोटी घेवून तस्कर पळून गेल्याने त्या मात्र वाचल्या. या कारवाईत ८ लाखाच्या बोटी नष्ट केल्या असून ४ लाखांचा वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी पहाटे साडेपाच ते सायंकाळी पाच या वेळेत ही कारवाई करण्यात आली.

तडवळ परिसरातील शेगाव हे वाळू तस्करीसाठी चर्चेत असलेले गाव आहे. मागील काही दिवसांपासून  येथे वाळू चोरी मोठ्या प्रमाणात वाढली होती. या संदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेवून ७ डिसेंबरला भल्या पहाटे ही कारवाई केली. बोटी ताब्यात घेण्याचा प्रयत्न होताच तस्करांनी दोन बोटी पाण्यात बुडवून कर्नाटक हद्दीत पळवून नेल्या. मात्र प्रत्येकी ४ लाख रुपये किंमतीच्या दोन बोटी या पथकाच्या हाती लागल्या. त्यांनी त्या जिलेटीन लावून नष्ट केल्या. 

या भागातील वाळू तस्करीला मदत करण्यात मंगरूळ आणि डोंबरजवळगे तलाठी व  रेकॉर्ड रूम मधील एक कोतवालाचा पुढाकार असायचा, अशी माहिती आहे. अक्कलकोट तहसील कार्यालयात वाळू तस्करी विरोधी पथक कार्यरत असताना सोलापुरातील अधिकाºयांनी ही कारवाई केली. त्यामुळे अक्कलकोटच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस