शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजार दुचाकी, चारशेहून अधिक चारचाकी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 14:13 IST

विजयादशमीचा मुहूर्त : लॉकडाऊननंतर आॅटोमोबाईल्स क्षेत्रात ४० कोटींची उलाढाल

ठळक मुद्दे मागील वर्षी अडीच ते तीन हजार दुचाकी आणि पाचशे ते सहाशे चारचाकी वाहनांची विक्री मागील सहा महिन्यात दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री झालीच नाही. वाहने खरेदी करता ग्राहक बाहेर पडले नाहीत

सोलापूर : विजयादशमीचा मुहूर्त आॅटोमोबाईल्स उद्योजकांसाठी खूप चांगला ठरला आहे. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात जवळपास अडीच हजार नवीन दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. तर चारशेपेक्षा अधिक चारचाकी नवीन वाहने आता रस्त्यावर धावतील. आॅटोमोबाईल्स उद्योगात जवळपास ४० कोटींची उलाढाल एका दिवसात झाल्याची माहिती आॅटोमोबाईल्स व्यावसायिकांकडून मिळाली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा चांगला व्यवसाय होईल की नाही याची साशंकता उद्योजकांमध्ये होती. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला व्यवसाय झाल्याची माहिती उद्योजकांनी दिली आहे. रविवारी सकाळपासून शहर व ग्रामीण भागातील सर्वच आॅटोमोबाईल्स शोरूममध्ये गर्दी होती. रात्री उशिरापर्यंत खरेदी सुरू होती. युवा वर्ग स्पोर्ट्स बाईक खरेदी करताना दिसले तर महिलांनी स्कुटी गाड्या खरेदीला पसंती दिली. तसेच फॅमिली कारला सर्वाधिक पसंती होती. सेव्हन सीटर मोठ्या वाहनांना खूप कमी मागणी होती. 

दरम्यान, वित्तपुरवठा संस्थांकडून विविध आॅफर्स देखील विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर होत्या. एक रुपये भरा आणि दुचाकी वाहन घेऊन जा.. फक्त पाच हजार रुपये डाऊन पेमेंट भरा आणि चारचाकी गाडी घेऊन जा अशा आॅफर्स देखील बाजारात होत्या. वित्तीय संस्थांकडून तत्काळ कर्जपुरवठा होत असल्याने वाहन खरेदीला मोठा हातभार लागला.--------मागच्या वर्षी सारखा व्यवसाय...अधिक माहिती देताना टीव्हीएस शोरूमचे व्यवस्थापक अंबादास भिमनपल्ली यांनी सांगितले, मागील वर्षी अडीच ते तीन हजार दुचाकी आणि पाचशे ते सहाशे चारचाकी वाहनांची विक्री झाली. यंदा कोरोना आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यात दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री झालीच नाही. वाहने खरेदी करता ग्राहक बाहेर पडले नाहीत. त्यामुळे मागील सहा महिन्यांचा जो पेंडिंग फ्लो होता तो दस?्याच्या मुहूर्तावर बाहेर पडला आणि तुफान खरेदी करू लागला. त्यामुळे मागील वर्षभरातला सर्वाधिक व्यवसाय रविवारी म्हणजे विजयादशमीच्या मुहूर्तावर झाला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरDasaraदसराMarketबाजारAutomobile Industryवाहन उद्योग