शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: दंड न भरलेल्या अडीच हजार वाहनधारकांना वाहतूक शाखेने पाठवल्या नोटिसा, कोर्टात हजर रहावे लागणार

By appasaheb.patil | Updated: February 8, 2023 13:17 IST

Traffic Police: आवाहन, सांगून, नोटीस व मोठी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देऊनही दंड न भरणाऱ्या वाहनधारकांना आता न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर -  आवाहन, सांगून, नोटीस व मोठी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देऊनही दंड न भरणाऱ्या वाहनधारकांना आता न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित केलेल्या लोकअदालतीत हजर राहून प्रलंबित दंडाची रक्कम भरण्यासंदर्भात सोलापूर शहरातील १ लाख २२ हजार तर सोलापूर ग्रामीण भागातील ९० हजार ९६८ वाहनधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. प्रलंबित दंड न भरल्यास वाहनधारकांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ई- चालान प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येते. सदर ई-चालान प्रणालीद्वारे कारवाई केलेल्या वाहनधारकांना एसएमएसद्वारे सदर चालानची रक्कम भरण्याबाबत सूचना देण्यात येतात. सूचना देऊनदेखील वाहनधारकांनी विचारण्याचे दंडाची रक्कम अद्याप तडजोड रकमेचा भरणा केलेला नाही, अशा वाहनधारकांना पुन्हा संधी देण्यासाठी अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) मुंबई कार्यालयाकडून एसएमएसद्वारे संदेश पाठवून प्रलंबित दंड भरण्याबाबत करण्यात आलेले आहे, तसेच जिल्हा विधिसेवा प्राधिकरण सोलापूर व पोलिस निरीक्षक वाहतूक व प्रभारी अधिकारी यांच्यामार्फत वाहनचालकांना प्रलंबित दंड भरण्याबाबत नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत. नोटीस मिळाली तर हजर राहावे लागणारवाहतूक नियम न पाळल्याबददल ज्या- ज्या वाहनधारकांना दंड भरण्याबाबत नोटीस मिळाली आहे. त्या वाहनधारकांनी ११ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या लोकअदालतीत हजर राहून दंडाची रक्कम भरावी. आपली काय तक्रार, अडचण असल्यास त्यासंदर्भातील माहिती लोकअदालतीत द्यावी, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. नोटीस मिळाली तर हजर राहावे लागणारच आहे, अन्यथा दंडाची रक्कम भरून आपण पुढील कारवाई टाळू शकतो, असेही वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.याठिकाणी भरू शकता दंडाची रक्कमवारंवार सांगूनही दंड न भरणाऱ्या वाहनधारकांवर आता कठोर कारवाई होणार आहे. त्यासाठी वाहनधारकांनी आपल्या वाहनावर प्रलंबित असलेल्या दंडाची रक्कम त्वरित भरावी. दंडाची रक्कम पोलिस अधीक्षक कार्यालय, शहर पोलिस आयुक्तालय, संबंधित वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी किंवा नजीकच्या पोलिस ठाण्यात दंडाची रक्कम भरण्याची सोय करण्यात आली आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसSolapurसोलापूर