शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी सिव्हिलमधील आयसोलेशन वॉर्डामध्ये टीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 15:50 IST

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय : अधिष्ठाता साधणार रुग्णांशी संवाद

ठळक मुद्देमनोरंजनात्मक कार्यक्रमांमुळे रुग्णांचा वेळही जातो. तसेच मनातील नकारात्मक विचार दूर होण्यास मदतही मिळेल.अ ब्लॉकमधील आयसोलेशन वॉर्डामध्ये पाच टीव्ही बसविण्यात येणार आहेत. फिजिकल डिस्टन्स पाळण्यासाठी रुग्ण हे दूर बसत आहेत. त्या

सोलापूर : कोरोना आजाराचा सामना करणारे रुग्ण तसेच संशयित रुग्णांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल ) टीव्हीची सोय करण्यात येणार आहे. रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी अधिष्ठाता हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

आयसोलेशन वॉर्डामधील रुग्णांमध्ये अंतर (फिजिकल डिस्टन्स) ठेवले जाते. यामुळे त्यांना कुणाशी संवाद साधता येत नाही. बाहेरदेखील जाता येत नाही. आधीच या आजारामुळे रुग्ण हा घाबरलेला असतो. त्यात कुणाशी बोलता आले नाही तर त्याचा विपरीत परिणाम त्याच्या मानसिकतेवर होऊ शकतो. हे टाळण्यासाठी रुग्णाचे मन गुंतविणे गरजेचे असते. हा विचार करून रुग्णालय प्रशासनाने आयसोलेशन वॉर्डामध्ये टीव्ही बसविण्याच्या कामास सुरुवात केली आहे. रुग्णांशी अधिष्ठाता वेळोवेळी बोलून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करणार आहेत. अधिष्ठाता यांच्या कार्यालयातून फ्लू ओपीडीमधील टीव्हीशी जोडणी करण्यात येणार आहे.

राज्यातील काही रुग्णालयांतून रुग्णांनी पलायन केले होते. त्यानंतर त्या रुग्णांना पुन्हा शोधावे लागले होते. त्यामुळे बहुतांश आयसोलेशन वॉर्डांमध्ये टीव्ही बसविण्याची कल्पना समोर आली.सिव्हिल हॉस्पिटलच्या ए ब्लॉकमध्ये १३ मार्च रोजी फ्लू ओपीडीची सुरुवात करण्यात आली. या ओपीडीमध्ये थर्मल स्कॅनर, हेमोग्राम, पल्स आॅक्सिमीटर, पोर्टेबल एक्स-रे या सुविधा देण्यात येत आहेत. आतापर्यंत या ओपीडीमध्ये तीन हजार ६०० जणांची तपासणी करण्यात आली आहे, तर आतापर्यंत ४४८ रुग्णांना येथे अ‍ॅडमिट केले होते.-----फक्त मनोरंजनाचे कार्यक्रम दाखविणार

ए ब्लॉकमधील आयसोलेशन वॉर्डामध्ये पाच टीव्ही बसविण्यात येणार आहेत. फिजिकल डिस्टन्स पाळण्यासाठी रुग्ण हे दूर बसत आहेत. त्यामुळे त्यांना टीव्ही दिसणार नाही, म्हणून ६५ इंचाचे पाच टीव्ही येथे लावण्यात येणार आहे. या टीव्हीवर फक्त मनोरंजनात्मक कार्यक्रम, चित्रपट, गाणी दाखविण्यात येणार आहेत. मनोरंजनात्मक कार्यक्रमांमुळे रुग्णांचा वेळही जातो. तसेच मनातील नकारात्मक विचार दूर होण्यास मदतही मिळेल.

-----

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस