शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

आषाढी वारीत चुरमुºयाची उलाढाल दीड कोटीवर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 16:37 IST

पंढरपुरात ४० हजार पोत्यांची विक्री; पंढरपुरी चुरमुºयाला भाविकांची सर्वाधिक पसंती

ठळक मुद्देपंढरपुरात चुरमुरे तयार करण्याचे केवळ दोन कारखाने जवळपास ५० व्यापारी होलसेल दरात चुरमुरे खरेदी करतातएक पोते ९ किलोचे असून, ते होलसेल दरात ३८० ते ४०० रुपयांना व्यापाºयांना विकले जाते़

प्रभू पुजारी

पंढरपूर : वर्षभरात जेवढी चुरमुºयाची उलाढाल होते, तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त उलाढाल केवळ आषाढी वारी सोहळ्यादरम्यान होते़ पंढरपुरी चुरमुºयाला भाविकांची सर्वाधिक पसंती असते़ पालखी सोहळ्यासह दिंड्यांमधून राज्याच्या कानाकोपºयातून लाखोंच्या संख्येने येणारे भाविक दर्शनानंतर घरी जाताना प्रसाद म्हणून चुरमुरे घेऊन जातात़ त्यामुळे आतापासूनच पंढरपुरातील कारखान्यांत चुरमुरे बनविण्याची लगबग सुरू असल्याचे दिसत आहे.

पंढरपुरात चुरमुरे तयार करण्याचे केवळ दोन कारखाने आहेत़ त्यांच्याकडूनच येथील जवळपास ५० व्यापारी होलसेल दरात चुरमुरे खरेदी करतात़ ते दुकानदारांना विकतात़ शहर व परिसरात एकूण एक हजार ते बाराशे मेवामिठाईची दुकाने आहेत़ हे दुकानदार भाविकांना प्रसाद म्हणून चुरमुरे विक्री करतात़ चुरमुºयाचे कारखानदार भारत कदम माहिती देताना म्हणाले, काही व्यापारी चुरमुºयाच्या पुड्या बनवून विक्री करतात़ ते चुरमुरे बेळगाव, कोल्हापूर, गुजरात, आंध्रप्रदेश येथील असतात़ मात्र वारकºयांची पसंतीही पंढरपूर चुरमुºयालाच जास्त आहे़ हा चुरमुरा प्रसाद म्हणून वापरला जातोच; पण भेळ, चिवडा, सुसला आदी पदार्थही बनविता येतात़ कच्चा माल म्हणजेच तांदूळ हा मध्यप्रदेश, कर्जत चौक, खालापूर येथून आणला जातो़ आता या व्यवसायातही अत्याधुनिक मशिनरी आल्या आहेत़

अशी आहे उलाढाल- एक पोते ९ किलोचे असून, ते होलसेल दरात ३८० ते ४०० रुपयांना व्यापाºयांना विकले जाते़ त्यामुळे आषाढी वारी सोहळ्यातील १५ दिवस वगळता वर्षभरातील ३६५ पैकी ३५० दिवसांत रोज १०० पोत्यांप्रमाणे ३५ हजार पोते होतात़ एक पोते सरासरी ३८० रुपयांना विकले तरी १ कोटी ३३ लाख रुपयांची उलाढाल होते़ ही वर्षभराची आकडेवारी आहे़ मात्र आषाढी कालावधीत ४० हजार पोत्यांची विक्री होते़ एक पोते सरासरी ३८० रुपयांना विकले तरी १ कोटी ५२ लाख रुपयांची उलाढाल होते.

अशी आहे चुरमुरे बनविण्याची प्रक्रिया- प्रथम रत्ना भात (तांदूळ) किमान आठ तास शिजविला जातो़ त्यानंतर तो भाजून त्यावर पाणी मारणे, पुन्हा थंड करणे, मग पॉलिश करणे, त्यातून तांब व तांदूळ विभक्त करणे़ नंतर ते तांदूळ सुकण्यासाठी टाकणे़ नंतर मशीनमध्ये टाकणे, त्यात मीठ मिक्स करणे़ मशीनमध्ये (रोष्टर) भाजणे़ त्यानंतर बलोटद्वारे हवेत उडविणे़ नंतर सेंट्री चाळणीने स्वच्छ करणे़ शेवटी ते पोत्यामध्ये भरणे, ही याची प्रक्रिया असते.

पंढरपुरी चुरमुºयाचे वैशिष्ट्य- पंढरपुरी चुरमुरे हे खुसखुशीत असतात़ शिवाय चविष्टही आहेत़ प्रसादाबरोबरच घरात चिवडा, भेळ, सुसला तयार करता येतो़ वृद्धांनाही पंढरपुरी चुरमुरे सहजासहजी खाता येतात़ या वैशिष्ट्यामुळे पंढरीत आलेला प्रत्येक भाविक आवर्जून पंढरपुरी चुरमुरे घेऊन जातोच, असे अनेक व्यापाºयांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा