शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

तुकाराम बीज उत्सव; विठ्ठल रथ सोहळ्याचे पंढरपूरहून देहूकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:12 AM

शेकडो वारकरी सहभागी; नामदेव पायरीजवळ झाली सामुदायिक प्रार्थना व आरती 

ठळक मुद्दे रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा रथ आणला जातोविठ्ठल रथ सोहळ्याची शेकडो वर्षांची परंपरा जपत आलोतुकाराम भेटीकरिता देव चालला हे कीर्तनातून सांगतो

पंढरपूर : संत तुकाराम बीजेनिमित्त श्री विठ्ठल रथाचे पंढरपूर विठ्ठल-रूक्मिणी मंदीरासमोरील नामदेव पायरी येथून हरिनामाच्या जयघोषात प्रस्थान झाले. त्याआधी सामुदायिक प्रार्थना व आरती  झाली. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते पादुका रथामध्ये स्थापन करण्यात आल्या. या सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी झाले  आहेत. 

दरम्यान, कैकाडी महाराज आश्रमात आलेल्या वारकºयांकडून दिवसभर भजन, कीर्तन, हरिपाठ झाला. त्यानंतर रथ हा विठ्ठल मंदिराकडे आणण्यात आला. हरिनामाचा जयघोष करीत हा सोहळा सायंकाळी ६ वाजता मार्गस्थ झाला. दि. १० मार्च रोजी हा सोहळा देहू येथे पोहोचणार आहे. संत कैकाडी महाराज यांचे पुतणे ह.भ.प. रामदास उर्फ शिवराज महाराज यांच्या पुढाकाराने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याला ३५० वर्षे होऊन गेली, हा सोहळा अखंडितपणे सुरू आहे. या पालखी सोहळ्यात महिला, पुरूष वारकरी सहभागी झाले आहेत. दुपारची विश्रांती, रात्रीचा मुक्काम तसेच त्यासाठीचे अन्नदाते याचे नियोजन करण्यात आले आहे. मुक्कामाच्या ठिकाणी भजन, कीर्तनाचे कार्यक्रम होतात. विविध भागांतून आलेल्या भाविकांकडून या सोहळ्यासाठी देगणी दिली जाते. तुकाराम बीजेच्या एक दिवस आधी दि. १० मार्च रोजी हा सोहळा देहू येथे पोहोचणार आहे. 

विठ्ठल रथ सोहळ्याची शेकडो वर्षांची परंपरा जपत आलो आहे. यामध्ये वारकरी उत्साहाने सहभागी होतात. तुकाराम भेटीकरिता देव चालला हे कीर्तनातून सांगतो. रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा रथ आणला जातो. हे दोन सोहळे साजरे केले जातात. याला वारकरी प्रतिसाद देतात.- ह.भ.प. रामदास महाराज जाधव 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी