शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शरद पवारांना कोण बोलणार ? मग नेते शोधायचे सुधाकरपंतांना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:35 IST

ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारकांच्या निधनानंतर नेतेमंडळींनी दिला आठवणींना उजाळा

ठळक मुद्देकेवळ शरद पवारच नव्हे तर राज्यातील मंत्र्यांनाही खडे बोल द्यायला परिचारक तयार असायचेआपली संस्था कशी टिकली पाहिजे याचा आलेखही त्यांनी घालून दिला होताअनेक नेते बोलायला घाबरायचे; पण हे काम सर्व नेत्यांनी पंतांवर सोपविले होते

राकेश कदम

सोलापूर : जिल्ह्यात विजयसिंह मोहिते-पाटील, गणपतराव देशमुख, कै. ब्रह्मदेवदादा माने, वि. गु. शिवदारे, सुधाकरपंत परिचारक, भाई एस. एम. पाटील, दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, राजन पाटील, दीपक साळुंखे, बबन आवताडे यांनी एक गट बांधला होता. या गटाचे व्यवस्थापक म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जाते. यापैकी एकाही नेत्याच्या घरात कुरबुर झाली तर ती परिचारक दूर करायचे. नेत्या-नेत्यांमध्ये वाद सुरू झाले की, अनेक नेते पंतांच्या वाड्यावर धाव घ्यायचे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून जिल्ह्यात दरवेळी वेगवेगळे डाव टाकले जायचे. अनेक नेते बोलायला घाबरायचे; पण हे काम सर्व नेत्यांनी पंतांवर सोपविले होते. 

केवळ शरद पवारच नव्हे तर राज्यातील मंत्र्यांनाही खडे बोल द्यायला परिचारक तयार असायचे. माजी आमदार राजन पाटील पंतांच्या आठवणी जागवताना म्हणाले, स्वत:चे घर चालवावे या पद्धतीने पंत आणि आमचे जुने नेते जिल्हा बँक आणि इतर संस्था चालवायचे.बँकेत संचालकांना येण्या-जाण्याच्या खर्चाचे किरकोळ पैसे पाकिटात दिले जायचे. पंत पैसे काढून घेतल्याने रिकामे पाकीट शिपायाच्या ताब्यात द्यायचे. हे पाकीट दुसºया कोणत्या तरी कामाला वापर म्हणून सांगायचे. विधिमंडळात १५ वर्षे मी त्यांच्या बाजूलाच बसून होतो. माझ्या लोकनेते कारखान्याच्या उभारणीत पंतांचा सिंहाचा वाटा आहे. माझ्या कर्जासाठी ते सांगली अर्बन बँकेत आले होते. आपली संस्था कशी टिकली पाहिजे याचा आलेखही त्यांनी घालून दिला होता. 

तुम्हीच काहीतरी मार्ग काढा...२००४ मध्ये राष्ट्रवादीने पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून एक उमेदवार दिला. या उमेदवाराच्या प्रचाराचा खर्च कुणी करायचा, असा प्रश्न उभा राहिला. शरद पवारांसोबत एक बैठक झाली. या बैठकीनंतर पंत पवारांकडे गेले. आम्ही आमच्या भागातील प्रचाराचा खर्च करू; पण सांगोला, मोहोळसह इतर भागातील लोक खर्च भागवू शकणार नाहीत. हा खर्च करून हे लोक अडचणीत येतील. तुम्हीच काहीतरी मार्ग काढा, असे त्यांनी पवारांना सांगितले आणि सूत्रे फिरली.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSharad Pawarशरद पवार