सोलापूर : येथील कलावंत, निवेदक जॉन येवलेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात ही श्रद्धांजली सभा पार पडली. प्रारंभी दत्ता गायकवाड यांच्या हस्ते येवलेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सतीश गायकवाड, मोहन आंग्रे यांनी येवलेकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या कलेबद्दल गौरवोद्गार काढले. त्यानंतर अखिल भारतीय नाट्य परिषद (उपशाखा) यांच्या वतीने विजय साळुंखे यांनी जॉन यांच्या सहवासातील आठवणी कथन केल्या. काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे रुस्तुम कंपली यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. यानंतर मिलन रेकॉर्डिंग रुमचे हकीम शेख यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. काडादी चाळीत जॉन यांनी केलेला ऑर्केस्ट्रा अकबर सोलापुरी यांनी सांगितला. राजा राजेशचंद्र, उषा प्रभुणे, लुथर गायकवाड, फिलीप नदवी, राजाभाऊ पवार, शशीकुमार तेलंग, राजू देसाई, शोभा पाडळे, सुधीर येवलेकर, मायकल श्रीसुंदर, रवी ताकपेरे उपस्थित होते.
जॉन येवलेकर यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST