शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही सावता महाराजांच्या भेटीसाठी खड्ड्यातूनच प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 12:52 IST

मोडनिंब ते अरण पालखी मार्गाचे काम अद्याप सुरू नाही; भाविकांनी व्यक्त केला संताप

ठळक मुद्देमोडनिंब ते पांडुरंग पालखी मार्गासाठी पाच कोटी रुपये मंजूर होऊनही अद्याप या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाहीयंदाही सावता महाराजांच्या भेटीला खड्ड्यातून जावे लागणार की काय? असा संताप भक्तांकडून व्यक्त होत आहे

मारूती वाघ मोडनिंब : मोडनिंब ते पांडुरंग पालखी मार्गासाठी पाच कोटी रुपये मंजूर होऊनही अद्याप या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. यंदाही सावता महाराजांच्या भेटीला खड्ड्यातून जावे लागणार की काय? असा संताप भक्तांकडून व्यक्त होत आहे.

आषाढ महिन्याच्या शेवटी संत सावता माळी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर ते मोडनिंबहून पालखी अरणला रथातून आणली जाते. दरवर्षी पालखीबरोबर असणाºया वारकºयांना पंढरपूर-कुर्डूवाडी रस्ता सोडून पांडुरंग पालखी मार्गाने मोडनिंब शिवारातील रस्त्यास लागल्यानंतर सात कि. मी. रस्त्यावर यावे लागते. गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्याचे काँक्रिटीकरण व्हावे अशी मागणी केली होती. 

समाजकल्याण विभागाचे माजी सभापती शिवाजी कांबळे, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांनी सोलापूर-पुणे महामार्गावर पालखी अडवून ठेवली होती. त्यावर अधिकाºयांनी लेखी आश्वासन दिले होते. मंत्री पंकजा मुंडे, आ. बबनदादा शिंदे, सावता परिषदेचे कल्याण आखाडे यांनी पाठपुरावा केला. ‘लोकमत’नेही या रस्त्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. यामुळे या रस्त्यासाठी मुख्यमंत्री निधीतून पाच कोटी रुपये मंजूर झाले.

सावता महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत या रस्त्याचे काँक्रिटीकरण होईल असे वाटले होते; मात्र अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. दरवर्षी आषाढीच्या निमित्ताने महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून अनेक वारकरी अरणला येतात. सातत्याने वारकºयांची वर्दळ सुरू होते. अनेकांना उखडलेली खडी, खड्ड्यातून जावे लागते. पाऊस झाला तर पाण्याने खड्डे पडतात. त्यामुळे वारकºयांना त्रास होतो. यामुळे काम सुरू करण्याची मागणी होत आहे.

कामाची निविदा निघाली असून, वर्कआॅर्डर निघाली नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम एक वर्षात पूर्ण होईल.-प्रकाश महाजनउपविभाग अधिकारी, मुख्यमंत्री सडक योजना

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीroad transportरस्ते वाहतूक