शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सोलापूरची परिवहन बससेवा बंद पडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:43 IST

९ महिन्यांचे वेतन मिळावे म्हणून सुरू केलेल्या आंदोलनाला २८ दिवस झाले तरी संप मिटलेला नाही. श्रेयवादात पदाधिकाºयांनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

ठळक मुद्देपरिवहनवर ३७ कोटी ५३ लाख ६0 हजार ४१३ रुपयांचा बोजा महिन्याकाठी दीड कोटी भाडे दिल्यास परिवहन सेवा सुरळीत चालेलमुख्यमंत्र्यांकडे परिवहनच्या खासगीकरणाचा प्रस्ताव

सोलापूर : महापालिका परिवहन कर्मचाºयांनी ९ महिन्यांचे वेतन मिळावे म्हणून सुरू केलेल्या आंदोलनाला २८ दिवस झाले तरी संप मिटलेला नाही. श्रेयवादात पदाधिकाºयांनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, तर प्रशासनाने खासगीकरणाचा घाट घातला आहे. एकूणच परिवहन सेवेला कुलूप घालण्याची सत्ताधाºयांची तयारी झाल्याचे दिसून येत आहे. 

महापालिका परिवहन कर्मचाºयांनी लालबावटा युनियनच्या नेतृत्वाखाली संप सुरू केला आहे. इकडे परिवहन समितीच्या सभापतीपदाची सूत्रे शिवसेनेकडे गेली आहेत. त्यामुळे महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजप पदाधिकाºयांची पंचाईत झाली आहे. संपावर तोडगा काढावा तर याचे श्रेय शिवसेना व लालबावटा युनियनला जाईल या भीतीपोटी या प्रश्नाकडे चालढकल केली जात आहे. महापौर शोभा बनशेट्टी यांनी परिवहनच्या प्रश्नाबाबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनाने विकासनिधीचा प्रश्न पुढे करून सदस्यांना गप्प केले आहे.

इकडे पालकमंंत्री विजयकुमार देशमुख  व सहकारमंत्री सुभाष देशमुख हेही परिवहनच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. एकीकडे स्मार्ट सिटीचे मार्केटिंग सुरू आहे तर दुसरीकडे याच स्मार्ट सिटीतील परिवहन सेवा बंद पडली आहे. महापालिकेच्या कारभारावर विश्वास नसल्याने एकाही नागरिकाने परिवहन सेवा बंद पडल्याबाबत तक्रार केली नाही, हे विशेष. काँग्रेसची सत्ता असताना पाणी आणि बससेवा व्यवस्थितपणे दिली. आता या दोन्ही गोष्टींची वाट लागली आहेत. वेळ आल्यावर आम्ही या प्रश्नाला वाचा फोडू, अशी भूमिका काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी मांडली आहे. 

माकपचे माजी आमदार आडम मास्तर यांनी कर्मचाºयांच्या वेतनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी परिवहनची वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांना सादर केली आहे. सन २0१५ मध्ये केंद्र शासनाच्या योजनेतून अशोक लेलँड कंपनीकडून १४४ बस खरेदी करण्यात आल्या.

यातील ९९ जनबसच्या चेसी क्रॅक झाल्याने आरटीओने नोंदणी रद्द केली. या वादाबाबत लवादापुढे सुनावणी सुरू आहे. यातील १0 वॉल्व्हो बस दोन वर्षांपासून बंद आहेत. ३४ स्टॅग बसपैकी १४ तर ६0 मिनीबस पैकी २३ बस सुरू आहेत. अशाप्रकारे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या २0३ बसपैकी ९९ बसच्या चेसी क्रॅक, ६७ बस नादुरूस्त असल्याने केवळ ३७ बस मार्गावर धावत आहेत. 

असा वाढत आहे तोटापरिवहनकडे प्रशासकीय कामासाठी ४0 सेवक, बस वाहतुकीसाठी ३११ कर्मचारी, वर्कशॉपसाठी १११ मेकॅनिक, हेल्पर असे ५६२ कर्मचारी कार्यरत आहेत. आस्थापनेवरील कायम कर्मचारी वारंवार गैरहजर राहतात. त्यामुळे बदली, रोजंदारी, कंत्राटी कर्मचाºयांना काम द्यावे लागते. वेतनावर महिना ८५ लाख खर्च येतो. पेन्शनचा खर्च ५४ लाख आहे. मार्चमध्ये ४0 बस मार्गावर होत्या. त्याचे उत्पन्न फक्त ५५ लाख ८0 हजार आले तर १ कोटी ८0 लाख खर्च झाला. एका महिन्यात १ कोटी २४ लाखांची तूट आली. परिवहनमधील ४६ सेवकांना महापालिकेच्या आस्थापनेवर घेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनाचा महिना साडेसात लाख खर्च महापालिका करीत आहे.

असा आहे खासगीकरणाचा प्रस्तावआयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे परिवहनच्या खासगीकरणाचा प्रस्ताव दिला आहे. कर्मचाºयांना व्हीआरएस देऊन फक्त शहरासाठी बससेवा दिल्यास ४0 बसमध्ये काम भागेल. या बस भाड्याने घेतल्यास महापालिका परिवहनला जे अनुदान देते त्याच खर्चात ही सेवा चालेल. दररोज ठराविक मार्गावर होणाºया खेपांचे अंतर गृहित धरून आरटीओकडून भाडे प्रमाणित करून घेण्यात आले आहे. त्यामुळे महिन्याकाठी दीड कोटी भाडे दिल्यास परिवहन सेवा सुरळीत चालेल. कर्मचाºयांची देणी, डिझेल खरेदी, बसचे मेन्टेनन्स या कटकटीतून मुक्तता मिळेल. 

परिवहनवर ३७ कोटींचा बोजापरिवहनवर ३७ कोटी ५३ लाख ६0 हजार ४१३ रुपयांचा बोजा आहे. त्यामध्ये जुलै २0१७ ते मार्चअखेर कर्मचाºयांचे वेतन : ७ कोटी २0 लाख, आॅक्टोबर २0१७ ते मार्चअखेर पेन्शन : ३ कोटी ३0 लाख, शासकीय कर : १0 कोटी ५ लाख, ईएसआय : ५७ लाख ६८ हजार, पतसंस्था: १३ लाख ८७ हजार, दाव्याची देय रक्कम : १ कोटी ५0 लाख, सेवकांचा पीएफ व तोषदान : ६ कोटी ९५ लाख, देना बँक कर्ज : ४ कोटी ५0 लाख.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका