शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील पोलीस कर्मचारी, अधिकाºयांच्या होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 11:55 IST

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय; नूतन पोलीस आयुक्त रूजू झाल्यानंतर निघणार आदेश

ठळक मुद्देनूतन पोलीस आयुक्त रूजू झाल्यानंतर निघणाºया आदेशात कोणाची बदली कोठे होईल याबाबतचे तर्कवितर्क लढविले जात आहेतपोलीस स्टेशनला काम करून कंटाळलेले काही कर्मचारी, अधिकारी आयुक्तालयात काम करण्यास इच्छुक आयुक्तालयातील अनेक कर्मचारी पोलीस स्टेशनला काम करण्याची संधी मिळेल का ?

सोलापूर : शहर पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी व अधिकाºयांच्या बदल्यांची यादी तयार झाली आहे. कमिटीची बैठक होणार असून, नूतन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे रूजू झाल्यानंतर बदल्यांची आॅर्डर निघणार आहे. 

शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत एकूण सात पोलीस स्टेशनचा समावेश आहे. फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेलरोड पोलीस ठाणे, सदर बझार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगरवस्ती पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे या ठिकाणी असलेले पोलीस कर्मचारी, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आदी कर्मचाºयांची यादी तयार झाली आहे.

एकाच पोलीस ठाण्यात पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केलेल्या कर्मचाºयांची बदली होणार आहे. काही कर्मचाºयांनी व अधिकाºयांनी बदलीसाठी विनंती अर्ज केला असून, त्याचाही विचार केला जाणार आहे. पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखा, महिला अन्याय-अत्याचार निवारण केंद्र, क्युआरटी, आय.बी., गुन्हे शाखा, आस्थापना विभाग, कंट्रोल रूम, पोलीस मुख्यालय आदी ठिकाणच्या कर्मचारी व अधिकाºयांच्याही बदल्या होणार आहेत. एकाच ठिकाणी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण केला आहे, अशा कर्मचाºयांची माहिती गोळा करण्यात आली आहे. नूतन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार घेतल्यानंतर खºया अर्थाने बदल्यांचे आदेश निघणार आहेत.   

पोलीस निरीक्षकांच्याही बदल्यांची शक्यता - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २0 फेब्रुवारी २0१९ रोजी आयुक्तालयातील अधिकाºयांच्या बदल्या झाल्या होत्या. आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा वर्ग-१ व वर्ग-२ प्रवर्गातील अधिकाºयांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा आयुक्तालयात रंगली आहे. नियमानुसार असलेला कार्यकाल पूर्ण केलेल्या सहायक पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षक यांची पदोन्नतीवर बदली होणार असून, त्यांना जिल्ह्याबाहेर जावे लागणार आहे. सर्व बदल्या आस्थापनाचे अपर पोलीस महासंचालकांच्या आदेशान्वये होणार आहेत. 

कर्मचारी, अधिकाºयांमध्ये वाढली उत्सुकता...- नूतन पोलीस आयुक्त रूजू झाल्यानंतर निघणाºया आदेशात कोणाची बदली कोठे होईल याबाबतचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. पोलीस स्टेशनला काम करून कंटाळलेले काही कर्मचारी, अधिकारी आयुक्तालयात काम करण्यास इच्छुक आहेत. आयुक्तालयातील अनेक कर्मचारी पोलीस स्टेशनला काम करण्याची संधी मिळेल का? याचा विचार करत आहेत. कालावधी पूर्ण केलेल्या कर्मचाºयांची बदली होणार यात शंका नाही, मात्र ती कोठे होईल, याची उत्सुकता सर्वच कर्मचारी व अधिकाºयांना लागून राहिली आहे. 

कर्मचारी व अधिकाºयांच्या बदल्यांबाबत माहिती मागवण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या अहवालावरून कमिटीची बैठक होईल, त्यानंतर नूतन पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये बदलीचे आदेश दिले जातील. - बापू बांगर, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा)

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPoliceपोलिस