शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

वाहतूक पोलिसांकडून अक्कलकोटमधील भाविकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 15:14 IST

अक्कलकोटमधील प्रकार: अवैध वाहतुकीला मात्र अभय

ठळक मुद्देसोलापूर,अक्कलकोट, गाणगापूर या मार्गावरून रोज हजारो स्वामीभक्तांची वर्दळ या प्रकाराला भाविक कंटाळले असून यावर नूतन पोलीस अधीक्षकांनी तत्काळ कारवाई करावी

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : वाहनांची कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली जिल्हा वाहतूक विभागाचे पोलीस अक्कलकोट येथे दर्शनासाठी येणाºया स्वामीभक्तांना नाहक त्रास देऊन आर्थिक लूट करीत आहेत. वाहतुकीला शिस्त लागावी, अवैध वाहतुकीवर नियंत्रण, शिस्त लावणे हे काम महत्त्वाचे असताना मात्र भाविकांकडून पैसे उकळण्यात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

वाहन व कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली संपूर्ण जिल्ह्यात पथक कार्यरत आहे. सोमवारी वाहतूक शाखेचे सहायक फौजदार लायनर, पो. हे. कॉ. कोळी, पो. हे. कॉ. माळी या तिघांनी अक्कलकोट-गाणगापूर रस्त्यावर सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत थांबून अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई करण्याऐवजी स्वामीभक्तांच्या गाड्या अडविल्या.

धाकधपटशा दाखवत त्यांच्याकडून पाचशे ते हजार रुपये उकळले. पोलीस अधिकारी-कर्मचाºयांनी चपळगाव, शिरवळ, वागदरी, सलगर, मैंदर्गी, दुधनी, तोळणूर, नागणसूर, तडवळ, करजगी या भागातून रोज ४०० ते ५०० जीप, टमटम, टेम्पो अशा प्रकारच्या वाहनांद्वारे अवैध प्रवासी वाहतूक होत असते. त्यांना मात्र मंथली घेऊन अभय देण्यात येत असून अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूरच्या भक्तांना मात्र नाहक त्रास देण्यात येत आहे.

अवैध वाहतूकदारांकडून मंथली वसुलीसाठी एक-दोन झीरो पोलिसांची नियुक्तीही करण्यात आली आहे. यामुळे अवैधवाले सध्या तुपाशी आणि भाविक मात्र उपाशी अशी स्थिती निर्माण झाली आहे. हा प्रकार रोखण्यासाठी स्वामी समर्थ पोलीस अधिकाºयांना सद्बुद्धी देईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मांस वाहतुकीचे काय?- अक्कलकोट मार्गावरून मैंदर्गी, आळंद, कलबुर्गी, मंगरूळ या ठिकाणावरून मांस वाहतुकीचे शेकडो टेम्पो दर आठवड्यातून जात असतात. मात्र यावर मंथलीपोटी कारवाई करण्यास स्थानिकासह जिल्हा वाहतूक पोलीस कुचराई करीत आहेत. याबरोबरच रोज कर्नाटकातून जडवाहतुकीच्या २०० ते ३०० वाहनांची वर्दळ असतानाही कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

सोलापूर,अक्कलकोट, गाणगापूर या मार्गावरून रोज हजारो स्वामीभक्तांची वर्दळ आहे. भाविकांच्या गाड्यांना अडवून कागदपत्रांची मागणी करतात. त्या नावाखाली पैशाची मागणी होत असते. या प्रकाराला भाविक कंटाळले असून यावर नूतन पोलीस अधीक्षकांनी तत्काळ कारवाई करावी.-शशिकांत कुंभार, स्थानिक रहिवासी, अक्कलकोट 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस