शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

Maharashtra Election 2019 :पारंपरिक विरोधकांनी कंबर कसली; पक्ष बदलल्याने चुरस वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 06:33 IST

विधानसभा निवडणुकीसाठी बार्शी मतदारसंघात गेल्या चार निवडणुकांप्रमाणे यंदा देखील सोपल-राऊत या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतच लढत होणार असली तरी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या वैराग भागातील निरंजन भूमकर यांच्या उमेदवारीने तुल्यबळ अशी तिरंगी लढत होणार हे उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर निश्चित झाले आहे़

समीर इनामदार ।लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर: विधानसभा निवडणुकीसाठी बार्शी मतदारसंघात गेल्या चार निवडणुकांप्रमाणे यंदा देखील सोपल-राऊत या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतच लढत होणार असली तरी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या वैराग भागातील निरंजन भूमकर यांच्या उमेदवारीने तुल्यबळ अशी तिरंगी लढत होणार हे उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर निश्चित झाले आहे़मागील दोन निवडणुकांत सोपल, राऊत यांच्याशिवाय विश्वास बारबोले व राजेंद्र मिरगणे यांनी नशीब अजमावून पाहिले. मात्र त्यात त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही़ राष्ट्रवादीचे नेते असलेले दिलीप सोपल हे यंदा शिवसेनेकडून बाण हातात घेऊन उभे आहेत़ भाजपमध्ये असलेल्या राजेंद्र राऊत यांना राजकीय अपरिहार्यता म्हणून ट्रॅक्टरवर बसून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घ्यावा लागला तर राष्ट्रवादीमध्येच असलेल्या निरंजन भूमकर यांनी निवडणूक लढविणे निश्चित केले. याशिवाय मनसेचे नागनाथ चव्हाण, हिंदू महासभेकडून बबिता काळे, बसपाकडून कनिष्क शिंदे तर राजेंद्र राऊत यांच्यासह नऊ अपक्षही निवडणूक लढवत आहेत़जमेच्या बाजूसध्या राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या महायुतीची मिळालेली उमेदवारी, प्रचारासाठी मिळणाऱ्या मोठ्या नेत्यांच्या सभा, महायुतीतील भाजपचे राजेंद्र मिरगणे व शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांची असलेली साथ, दांडगा जनसंपर्क व राजकीय अनुभवग़ेल्या ३५ वर्षांपासून तालुक्यात आमदार आणि मंत्री म्हणून केलेले नेतृत्व, पाणीपुरवठा मंत्री असताना तालुक्यात केलेल्या पाणीपुरवठा योजना.महायुतीची उमेदवारी मिळाली नसली तरी मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांशी असलेले चांगले संबंध, नगरपालिका, बाजार समिती, पंचायत समिती व राज्य सरकारच्या सत्तेच्या माध्यमातून तालुक्यात केलेली विकासकामे, महायुतीची उमेदवारी मिळणार नाही हे गृहीत धरून केलेली निवडणुकीची तयारी, अपक्ष असतानाही मोठ्या प्रमाणात गटात होत असलेले इनकमिंग, विश्वासू कार्यकर्त्यांची तगडी फौज़उणे बाजूबाजार समिती कथित गैरव्यवहार प्रकरणी दाखल झालेले गुन्हे, कुमुदा-आर्यन ऊस बिल प्रकरण, मागील एक वर्षात कमी झालेला जनसंपर्क, मागील दोन-तीन वर्षांत बाजार समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांत झालेला पराभव, आजवर बाजार समिती, जिल्हा बँक आदी संस्थांत कार्यरत असलेल्या विश्वासू कार्यकर्त्यांचा कमी असलेला सहभाग़ राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नसल्यामुळे पारंपरिक मतदार दुरावण्याचा धोका़महायुतीची उमेदवारी मिळवण्यात आलेले अपयश, नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या विकासकामाच्या निमित्ताने शहरात तयार होत असलेला चिखल व धुळीमुळे हैराण असलेली जनता, पाणीपुरवठ्याचे न करता आलेले योग्य नियोजन, अपक्ष उमेदवारी असल्याने प्रचारासाठी स्टार प्रचारक आणता न येणे. ऐनवेळी सोपल यांनी केलेल्या महायुतीतील प्रवेशामुळे होणारी कोंडी सोडविता न येणे.

टॅग्स :solapur-city-central-acसोलापूर शहर मध्य