शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेडिमेड शेती अवजारांमुळे पारंपरिक लोहार व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:20 IST

तरूणाची कुटुंबासह भटकंती; शिक्षण अर्धवट सोडून स्वीकारला पिढीजात व्यवसाय

ठळक मुद्देनाशिक तालुक्यातील आंबड या गावचे सचिन सोळंखे हे पत्नी, दोन मुली व एक वर्षाचा छोटा मुलगा घेऊन शेकडो किलोमीटर अंतर पार करून सुस्ते (ता. पंढरपूर) या गावी आलेउन्हाळ्यानंतर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतात़ खरीप पेरणीसाठी विविध अवजारे दुरुस्ती करून घेणे किंवा नवीन घेण्याची शेतकºयांची धडपड सुरू असते़

अंबादास वायदंडे 

सुस्ते : आमच्या अनेक पिढ्यांपासून पोटासाठी लोहार हा व्यवसाय करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात भटकंती करीत आहोत़ पण वर्तमानकाळात रेडिमेड शेती अवजारे मिळत असल्याने आमचा पारंपरिक व्यवसाय संकटात आला आहे़ आज या गावात तर दोन दिवसानंतर दुसºयाच गावात असे किती दिवस भटकंती करायची, असा सवाल सचिन सोळंखे यांनी उपस्थित केला.

नाशिक तालुक्यातील आंबड या गावचे सचिन सोळंखे हे पत्नी, दोन मुली व एक वर्षाचा छोटा मुलगा घेऊन शेकडो किलोमीटर अंतर पार करून सुस्ते (ता. पंढरपूर) या गावी आले आहेत.

उन्हाळ्यानंतर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतात़ खरीप पेरणीसाठी विविध अवजारे दुरुस्ती करून घेणे किंवा नवीन घेण्याची शेतकºयांची धडपड सुरू असते़ त्यामुळे आम्हाला केवळ शेतकºयांकडून चार पैसे मिळतात़ मात्र यंदा पावसाळा लांबला परिणामी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत़ त्यामुळे यावर्षी शेतकºयांबरोबरच आमच्या व्यवसायावरही संकट निर्माण झाले आहे़ शेतकरी सुखी झाला तरच आम्ही सुखी, असे सचिन सोळंखे सांगत होते.

माझे गावीच केवळ सातवीपर्यंत शिक्षण झाले़ त्यानंतर पुढील शिक्षण परिस्थितीमुळे बाहेरगावी जाऊन करणे शक्य झाले नाही़ म्हणून शिक्षण सोडून पारंपरिक लोहार व्यवसाय करण्यास सुरुवात केली़ पूर्वी आई-वडिलांसोबत फिरताना चांगला व्यवसाय व्हायचा़ पण कालानुरुप शेतीतही आधुनिक यंत्राचा वापर वाढला़ रेडिमेड अवजारे शेतकरी वापरु लागले, त्यामुळे आमच्या व्यवसायावर संकट आले़ 

तीन मुले व पत्नीला घेऊन लोहार व्यवसायाच्या निमित्ताने गाव सोडून ७ ते ८ महिने बाहेरगावीच असतो़ गावाकडे वयोवृद्ध आई, वडील असतात. त्यांच्या दवाखान्याचा खर्चही आम्हालाच करावा लागतो़ वर्षातून केवळ चार महिने गावांकडे राहतो़ त्यामुळे मुलींच्या शिक्षणाची अडचण होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

लोहार व्यवसायात ७० टक्के महिलांचे योगदानगावोगावी फिरत असताना गावाच्या शेजारी रिकामी जागा दिसली की तेथेच पाल टाकून संसार थाटला जातो़ आम्ही पुरुष मंडळी केवळ लोखंड लाल झाल्यानंतर त्याला आकार देण्याचे काम करतो, पण या व्यवसायात ७० टक्के महिलांचेच योगदान आहे़ कारण ज्या गावात उतरलो त्या गावातून कोळसा गोळा करणे, भात्याला हवा मारणे, लोखंड लाल झाल्यानंतर त्यावर हातोड्याचे घाव मारणे, तयार केलेले अवजार पुन्हा गावात फिरून विकणे ही सर्व कामे महिलाच करतात़ सध्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे़ शिवाय घरोघरी गॅसचा वापर वाढला आहे़ त्यामुळे आता ग्रामीण भागातही सहजासहजी कोळसा मिळत नाही़ तरीही फिरून थोडा का होईना आणतोच, असे सीमा सोळंखे या सांगत होत्या़ 

टॅग्स :SolapurसोलापूरNashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरी