शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

मंगळवेढ्याजवळ ट्रॅक्टरची मोटारसायकलला जोराची धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 06:42 IST

मंगळवेढा-मरवडे मार्गावरील घटना,ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा/लोकमत न्युज नेटवर्क

 मंगळवेढा-मरवडे मार्गावर ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणे भरधाव वेगात वाहन चालवून मोटर सायकलस्वारास धडक देवून अकबर शेख (वय 38 रा. बालूग्राम जि.साहेबगंज, झारखंड) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जितेंद्र दुर्योधन साखरे (रा.उचेठाण) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेची हकिकत अशी, मंगळवेढा-मरवडे मार्गावर दि.22 रोजी सकाळी 8.45 वा. एम एच 45 यु 5961 या मोटर सायकलवर यातील मयत अकबर शेख हा रबीउल शेख यास पाठीमागे बसवून जात असताना तळसंगी फाटयाजवळील माऊली हॉटेलजवळ ते आले असता समोरून येणारे ट्रॅक्टर नं.के.ए.28 टी.8898 याचे पाठीमागील दोन डंपींग ट्रॉल्या असलेल्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने अकबर शेख हा गंभीर जखमी होवून जागेवर मयत झाला. तर  पाठीमागे बसलेला रबीउल शेख हा जखमी झाला आहे. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे 20 हजार रुपयांचे नुकसान  होण्यास आरोपी जितेंद्र साखरे हा कारणीभूत ठरल्याचे अब्दुलकलाम मैनूल हक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या अपघाताचे वृत्त पोलिस हवालदार महेश कोळी यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जावून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. तसेच मयताचे शवविच्छेदन करून मृतदेह संबंधितांच्या नातेवाईकाकडे रात्री कोळी यांनी ताब्यात दिला आहे. झारखंड हे अपघात स्थळापासून दूर असल्याने सदर मृतदेह विमानाने नेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस