शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करणार; मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन

By appasaheb.patil | Updated: July 3, 2023 12:46 IST

Solapur: सोलापूर शहर जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाजुला अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत त्यामुळे जिल्ह्याला धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करणार तसेच केटरिंग कॉलेजला श्री स्वामी समर्थांचे नाव देण्यात येणार असल्याचे राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूरसोलापूर शहर जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाजुला अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत त्यामुळे जिल्ह्याला धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करणार तसेच केटरिंग कॉलेजला श्री स्वामी समर्थांचे नाव देण्यात येणार असल्याचे राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

पर्यटन विभागाच्या वतीने केटरिंग कॉलेजच्या पदवी पदविका अभ्यासक्रमाचा शुभारंभ लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य, आ.विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याणशेट्टी, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. भगवतंराव पाटील, व्यवस्थापकिय संचालक श्रध्दा जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते. 

गुरू पोर्णिमेचा मुहूर्त साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कॉलेजच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातून हॉटेल व्यवसायासाठी लागणारे चांगले मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात पर्यटनाचा ओघ सुध्दा वाढणार आहे. असेही नामदार लोढा यांनी यावेळी सांगितले.

या सर्व लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून नामदार मंगलप्रभात लोढा यांनी सोलापूर जिल्ह्याला धार्मिक पर्यटन क्षेत्राचा दर्जा लवकरच देणार असल्याचे जाहिर केले. सूत्रसंचालन एैश्वर्या हिबारे तर आभार प्राचार्य चंद्रशेखर जयस्वाल यांनी व्यक्त केले. सोलापूरच्या इतिहासात आणि विकासाला नव्याने चालना मिळणाऱ्या या केटरिंग कॉलेजच्या अभ्यासक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी मोठ्याप्रमाणात नागरीकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :Mangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढाSolapurसोलापूर