शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील गड्डा यात्रेत होम मैदानाचे तीन-तेरा वॉकिंग ट्रॅकचे नुकसान, झाडेही तोडली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 10:54 IST

सोलापूर : गड्डा यात्रेच्या कालावधीत होम मैदानावरील झाडे, वॉकिंग ट्रॅक, बाकडे आदींचे तीन-तेरा होत आहेत. या नुकसानीला आम्ही जबाबदार ...

ठळक मुद्देनुकसानीला आम्हाला जबाबदार धरू नका, ठेकेदाराचे महापालिकेला पत्र नगर अभियंता संदीप कारंजे यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होम मैदानावर वाहने आणण्यास बंदी घालावी, असे महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी देवस्थान समितीला कळविले होते

सोलापूर : गड्डा यात्रेच्या कालावधीत होम मैदानावरील झाडे, वॉकिंग ट्रॅक, बाकडे आदींचे तीन-तेरा होत आहेत. या नुकसानीला आम्ही जबाबदार असणार नाही, असे पत्र निखिल कस्ट्रक्शन कंपनीच्या व्यवस्थापकांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. नगर अभियंता संदीप कारंजे यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

ग्रामदैवत सिद्धेश्वराच्या यात्रेनिमित्त परंपरेनुसार महापालिकेने १५ डिसेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीसाठी होम मैदानाचा ताबा सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीला दिला आहे. स्मार्ट सिटी योजनेतून होम मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या सुशोभीकरणाला बाधा येऊ नये, अशा पद्धतीने यात्रेचे नियोजन करावे. बाधा आल्यास या नुकसानीची जबाबदारी देवस्थान कमिटीवर असेल, अशी अट घालून महापालिकेने यावर्षी होम मैदानाचा ताबा दिला आहे. होम मैदानाच्या सुशोभीकरणाचे काम निखिल कस्ट्रक्शनला देण्यात आले आहे.

या मैदानाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी तीन वर्षांसाठी निखिल कस्ट्रक्शनवर सोपविण्यात आलेली आहे. गड्डा यात्रेच्या काळातील मैदानाची अवस्था पाहून निखिल कस्ट्रक्शनच्या व्यवस्थापकांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. मैदानावरील झाडे खराब झाली आहेत. मैदानावर मोठे खड्डे करण्यात आले आहेत. पेव्हर ब्लॉक, बाकडे यांचीही अवस्था खराब होत आहे. याची नोंद आपण करून घ्यावी. मैदानाचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर असणार नाही, असेही व्यवस्थापकांनी कळविले आहे. नगर अभियंता संदीप कारंजे यांनी मैदानाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

आराखड्याबाहेर स्टॉल- देवस्थान कमिटीने यात्रेसाठी आराखडा तयार केला होता. या आराखड्याला मंजुरी देताना महापालिकेने काही सूचना केल्या. त्यातील काही सूचना दुरुस्त करण्यात आल्या. पण आराखड्याच्या बाहेर रस्त्यावर अनेक ठिकाणी स्टॉल टाकण्यात आले आहेत. त्याची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. यात्रेनंतर कारवाई होईल, असे संकेतही दिले होते.

वॉकिंग ट्रॅकवर गाड्या - होम मैदानावर वाहने आणण्यास बंदी घालावी, असे महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी देवस्थान समितीला कळविले होते. त्यानुसार नॉर्थकोट मैदानाकडे पार्किंगची सोयही करण्यात येत होती. परंतु, सध्या थेट होम मैदानावरच पार्किंग करण्यात येत आहे. गड्डा यात्रेला येणारे अनेक ‘स्मार्ट सोलापूरकर’ वॉकिंग ट्रॅकवर दुचाकी लावत आहेत. वॉकिंग ट्रॅकवर पाणी, कचरा टाकला जात आहे. स्टॉलधारकांचे पाणीही वॉकिंग ट्रॅकवर येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याचे फोटो काढून महापालिकेला देण्यात आले आहेत. 

होम मैदानावरील वॉकिंग ट्रॅकला बाधा येऊ नये म्हणून एका बाजूला पत्रे टाकण्यात आले आहेत. आम्ही अद्याप मैदानाची पाहणी केलेली नाही. काय नुकसान झाले आहे, याचीही माहिती घेतलेली नाही. या सर्व गोष्टी यात्रा झाल्यानंतर पाहता येतील. - बाळासाहेब भोगडेसदस्य, सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्राSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका