शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूक सोने खरेदीत; तीन महिन्यांत सोन्याच्या दरात तब्बल साडेआठ हजारांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 14:30 IST

चांदीही महागली; संभाव्य दरवाढीमुळे गुंतवणुकीसाठी खरेदी सुरू

ठळक मुद्देकोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन करावे लागलेलॉकडाऊनमुळे कुठेच दागिन्यांची खरेदी होऊ शकली नाहीनव्या जोडप्यासाठी तयार दागिने खरेदीवर भर दिला

सोलापूर : लॉकडाऊनच्या तीन महिन्यात सुवर्ण पेढीत दराने चांगलीच उसळी घेतली आहे. या काळात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम आठ हजार पाचशे रुपयांनी ; तर चांदीच्या दरात प्रतिकिलो दहा हजार पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. येत्या तीन महिन्यात सोन्याचा दर ८५ हजारांवर जाण्याच्या चर्चेने काही लोकांची गुंतवणूक सोने खरेदीत होत आहे.

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन करावे लागले. मे महिना हा लग्नसराईचा काळ होता. लॉकडाऊनमुळे कुठेच दागिन्यांची खरेदी होऊ शकली नाही. संपूर्ण सराफ बाजार बंद होता. सराफ बाजार सुरू होताच काही कुटुंबांनी नव्या जोडप्यासाठी तयार दागिने खरेदीवर भर दिला. बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली. या काळात बºयापैकी खरेदी झाली तसेच सोन्याच्या दरात आठ हजार पाचशे रुपये तर चांदीच्या दरात १० हजार पाचशे रुपयांनी वाढ झाली. मागील वर्षी मे महिन्यात सोन्याचा दर बत्तीस हजार रुपये होता. या वर्षी हाच दर ४० हजारांवर पोहोचला. दिवाळीपर्यंत सोन्याचा दर हा ऐंशी हजारांवर जाईल ही चर्चा सराफ बाजारात, सर्वसामान्यांमध्ये रंगली. परिणामत: काही हौशीवंतांनी जागेच्या गुंतवणुकीला सोने गुंतवणूक हा पर्याय समजायला लागले. ही गुंतवणूक सुरक्षित मानली जात आहे. जास्त पैसे मिळवून देणारी गुंतवणूक मानली जात आहे. त्यामुळे काहीअंशी गुंतवणुकीचा कल हा दागिन्यांकडे दिसून येतोय.

आॅगस्टनंतर सोन्याचा दर ८५ हजारांवर जाईल असे वाटत नाही; मात्र सध्याच्या दरात काहीअंशी वाढ होऊ शकते. दरवाढीची चर्चा तर बाजारपेठेत रंगली आहे. काही निवडक ग्राहक तयार दागिन्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. जर कोरोनावर लस निघाली तर परिस्थिती पूर्वपदावर येईल आणि गुंतवणूक घटेल. सध्या काही ग्राहक जुने दागिने आणून मोड घालताहेत. नव्याने गुंतवणूक करत आहेत.- मिलिंद वेणेगूरकरसराफ व्यावसायिक

सराफ बाजार हा आता काहीअंशी शेअर बाजारावर अवलंबून राहिला आहे. शेअर बाजारातील पॉलिसीवरून दरात काहीअंशी वाढ झाली. चर्चा रंगली असली तरी यापुढे आणखी वाढ होईल असे वाटत नाही. सोन्यात केलेली गुंतवणूक शाश्वत आणि सुरक्षित मानली जात आहे. ही गुंतवणूक वेळप्रसंगी कामाला येते. यापुढे वाढ होईल अशी परिस्थिती सोलापुरात नाही.- गिरीश देवरमनी अध्यक्ष, सराफ असोसिएशन 

टॅग्स :SolapurसोलापूरGoldसोनंMarketबाजार