शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एकाच घरातील तिघी मुलींना फूस लावून पळवले; साडेपाच लाखांची रोकड अन् दागिनेही नेले

By विलास जळकोटकर | Updated: September 29, 2023 18:53 IST

एकाच घरातील तिघी मुलींना फूस लावून पळवून नेण्याची घटना शहरापासून जवळच असलेल्या एका गावात घडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सोलापूर : एकाच घरातील तिघी मुलींना फूस लावून पळवून नेण्याची घटना शहरापासून जवळच असलेल्या एका गावात घडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी या मुलींच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली आहे. पळवून नेलेल्यांपैकी दोन मुली आणि एक पुतणी असून जाताना त्यांनी साडेपाच लाखांची रोकड आणि २८ ग्रॅम सोन्याची दागिने नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शहरापासून जवळ असलेल्या एका गावामध्ये एकत्रित असलेले कुटुंब किराणा दुकान चालवतात. 

त्यातील फिर्यादी मुलीच्या आईच्या दोन मुली व पुतणी या तिघींना कोणीतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. २७ जुलैच्या दुपारी दीडच्या सुमारास या मुलींनी घरात साप निघाला आहे म्हणून आरडाओरडा केला. या दरम्यान दरवाजाला कडी लावून या तिघीही पसार झाल्या. जाताना साडेपाच लाखांची रोकड आणि २८ ग्रॅम वजनाचे दागिनेही नेल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे. तिघाही मुलींचा शोध घेऊनही त्या मिळून न आल्याने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन कोणीतरी आमच्या मुलींना फूस लावून पळवून नेल्याची तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भा. द. वि. ३६३, ३६६ अन्वये गुन्हा नोंदला आहे. तपास फौजदार मंद्रूपकर करीत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी