शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कांदा घेऊन जाणार्‍या पिकअपचे टायर फुटल्याने तिघांचा मृत्यू, सोलापूर-पुणे महामार्गावरील घटना

By appasaheb.patil | Updated: November 16, 2022 13:54 IST

मोहोळजवळील कोळेगाव हद्दीत कांदा घेऊन जात असलेला पिकअप टायर फुटल्याने पलटी झाली.

सोलापूर : मोहोळजवळील कोळेगाव हद्दीत कांदा घेऊन जात असलेला पिकअप टायर फुटल्याने पलटी झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळजवळील कोळेगाव हद्दीत घडली. 

या अपघातात दत्तात्रय भानुदास शेळके (५५), श्रीमंतसिंग धोडिंराम परदेशी (५०), नितीन बजगे (वय ३५) या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मयत शेतकरी हे मंगळवारी रात्री शेतातून कांदा घेऊन सोलापूर येथील बाजार समितीत लिलाव करण्यासाठी आणत होते. पहाटेच्या सुमारास वेगात असलेल्या पिकअपचे टायर अचानक फुटले. त्यानंतर पिकअप पलटी झाला.

पलटी झाल्यानंतर गाडीत बसलेले शेतकरी फेकले गेले, त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती, त्यातच दोघांचा जागीच तर एकाचा उपचारा दरम्यान शासकीय रूग्णालय, सोलापूर येथे मृत्यू झाला. अपघातानंतर मोहोळचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठविले. या घटनेची नोंद मोहोळ व शासकीय रूग्णालयातील पोलिस चौकीत झाली आहे. या अपघातानंतर रस्त्यावर कांद्यांचे पोतेच पोते पडले होते, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. मात्र वाहतूक शाखेच्या पथकाने काही वेळातच वाहतूक रस्त्यासाठी खुला केला.

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर