शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

माघ वारीत गरिबाच्या पांडुरंगाला तीन कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 10:54 IST

पंढरपूर : महाराष्ट्रासह देशभरातील भाविक पंढरपूरच्या विठ्ठल चरणी

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत या वर्षी मंदिर समितीच्या उत्पन्नात १ कोटी ३१ लाख ६८ हजार ६८८ रुपयांची वाढ भाविकांचे पांडुरंगावर अर्थात विठ्ठलावर असलेल्या निस्सीम भक्तीचे हे द्योतक म्हणावे लागेल

पंढरपूर: गरिबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाºया पंढरपूरच्या पांडुरंगाला यंदाच्या माघ वारीमध्ये तब्बल २ कोटी ९० लाख २६ हजार ५७९ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीपेक्षा या उत्पन्नामध्ये १ कोटी ३१ लाखांनी वाढ झाली आहे. गतवर्षी माघ वारीच्या काळामध्ये १ कोटी ५८ लाख ५७ हजार ८९१ रुपयांचे उत्पन्न मंदिर समितीला प्राप्त झाले होते.

पांडुरंगाच्या अर्थात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्टÑच काय देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. अलीकडे तर परदेशातूनही भाविक आकर्षित होऊ लागले आहेत. यंदाच्या माघ वारी यात्रेच्या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांनी मंदिर समितीला सढळ हाताने मदत केल्याचे दिसून आले. यामुळे मंदिर समितीला गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी १ कोटी ३१ लाख ६८ हजार ६८८ रुपयांनी वाढ झाली आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीमार्फत माघी यात्रा २०२० मध्ये माघ शु. १ ते माघ शु. १५ या कालावधीत भाविकांची दर्शन व्यवस्था चांगल्या प्रकारे होण्यासाठी योग्य नियोजन केले होते. या कालावधीत भाविकांकडून प्राप्त होणाºया निरनिराळ्या देणगी रकमा व अन्य मार्गाने समितीस एकूण २ कोटी ९० लाख २६ हजार ५७९ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

या देणगी उत्पन्नामध्ये श्री विठ्ठलाच्या पायावर १९ लाख २२ हजार २०७ रुपये, श्री रुक्मिणी मातेच्या पायावर ५ लाख ५८ हजार ३०२ रुपये, अन्नछत्र देणगी २ लाख ११ हजार ४७६, पावती स्वरुपातील देणगी ५० लाख ७२५ रुपये, बुंदी लाडू प्रसाद विक्री ३५ लाख ९९ हजार १३० रुपये, राजगिरा लाडू विक्री ३ लाख ५८ हजार रुपये, फोटो विक्री ६६ हजार १२५ रुपये, भक्तनिवास, वेदांता, व्हिडिओकॉन, श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास २२ लाख २८ हजार ४८० रुपये, नित्यपूजा १ लाख ३६ हजार रुपये, हुंडी पेटीमध्ये जमा ७४ लाख ७४ हजार ८०९ रुपये, परिवार देवता १४ लाख ९६ हजार १७४ रुपये, आॅनलाईन देणगी १७ लाख ३१ हजार ३२२ रुपये व अन्य स्वरूपात ४२ लाख ४३ हजार ८२९ रुपयांचा समावेश आहे. गतवर्षी याच कालावधीमध्ये १ कोटी ५८ लाख ५७ हजार ८९१ रुपयांचे उत्पन्न मंदिर समितीला प्राप्त झाले होते.

मंदिर समितीला १५०० डॉलरचे दान

  • - अमेरिकेत स्थायिक असलेल्या एका दाम्पत्याने पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेतले असून, मंदिर समितीला १५०० डॉलर दान केले तर स्वदेशातील एका उद्योजकाने हेलिकॉप्टरने प्रवास करून पांडुरंगाचे दर्शन घेतले आहे. 
  • - रामचंद्रराव आर. वेमुलापल्ली व जांसी रामचंद्रराव वेमुलापल्ली (रा. लॉन को हिल्स वेलिंग्स्टन, अमेरिका) हे दाम्पत्य श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंगळवारी पंढरपुरात आले होते. त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला १५०० डॉलर दान केले. या डॉलरचे भारतीय चलनाप्रमाणे एक लाख सहा हजार रुपये होतात.  मंदिर समितीच्या वतीने  विठ्ठुरायाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला. 
  • - पुणे येथील उद्योजक सुधीर मांडके  यांच्यासह पत्नी माधुरी मांडके, मुलगा इंद्रदील आणि नताशा मांडके यांनी विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. 

गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी मंदिर समितीच्या उत्पन्नात १ कोटी ३१ लाख ६८ हजार ६८८ रुपयांची वाढ झाली आहे. भाविकांचे पांडुरंगावर अर्थात विठ्ठलावर असलेल्या निस्सीम भक्तीचे हे द्योतक म्हणावे लागेल.- विठ्ठल जोशीमंदिर समिती कार्यकारी अधिकारी 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर