शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; सोलापूर जिल्ह्यातील ७५ न्यायालयाचे कामकाज चालणार तीन तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 16:34 IST

मुंबई उच्च न्यायालयाकडून सूचना; कोरोना व्हायरसमुळे न्यायालयातील गर्दी टाळण्याच्या सूचना

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात एकूण शहर व विविध तालुक्यात एकूण ७५ न्यायालये शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात विविध असे एकूण २९ न्यायालय बार्शी, मोहोळ, करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, अक्कलकोट या ठिकाणी सर्व मिळून ४0 न्यायालये

सोलापूर : कोरोना व्हायरसमुळे न्यायालयाचे कामकाज तीन तास तर कार्यालयीन कामकाज चार तास चालवण्यात यावे अशा सूचना  मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या आहे. त्यानुसार सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्यावतीने त्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारपासून राज्यातील सर्व न्यायालये ३ ते ४ तास या वेळेत चालवण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेवरून १७ मार्चपासून सकाळी ११ ते २ या वेळेत न्यायालयीन कामकाज चालणार आहे. दरम्यान न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी, पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी, साक्षीदारांचे न्यायालयाकडुन नोंदविले जाणारे जवाब (सीआरपीसी १६४), तत्काळ मनाई हुकूमाचे आदेश, स्थगिती आदेश इत्यादी कामकाज होणार आहे. 

कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी न्यायालयाने परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याच्याही सुचना केल्या आहेत. एका ठिकाणी गर्दी करून उभे राहू नये, एक मेकांना स्पर्श करून नये असा सल्लाही दिला आहे. न्यायालयाच्या परिसरातील कॅन्टीन, बाररूम हे ११ ते २ नंतर बंद करण्याच्या सुचना दिल्या आहेत. न्यायालयाचे कामकाज हे तीन तासाचे असले तर न्यायालयातील कार्यालयीन कामकाजाचे तास सकाळी १0.३0 ते २.३0 असे ठेवण्यात आले आहे. यामध्ये फक्त ५0 टक्के कर्मचारी आदलुन बदलून काम करणार आहेत. एके दिवशी ५0 टक्के कर्मचारी काम करतील तर दुसºया दिवशी ५0 टक्के कर्मचारी कामावर येतील. यामुळे न्यायालयातील कर्मचाºयांना एक दिवसाआड सुट्टी मिळणार आहे. 

जिल्ह्यात एकूण ७५ न्यायालये...- सोलापूर जिल्ह्यात एकूण शहर व विविध तालुक्यात एकूण ७५ न्यायालये आहेत. शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात विविध असे एकूण २९ न्यायालय आहेत. अन्य ठिकाणी कौटुंबीक न्यायालय, ग्राहकमंच आदी ६ न्यायालये आहेत. शहरात एकूण ३५ न्यायालये आहेत. जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, अक्कलकोट या ठिकाणी सर्व मिळून ४0 न्यायालये आहेत. सर्व न्यायालये पुढील सूचन येई पर्यंत ३ ते ४ तास या वेळेत चालणार आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोनाHealthआरोग्यCourtन्यायालय