शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पंतप्रधानांसोबतच्या ‘परीक्षा पे चर्चा’ त सोलापूर जिल्ह्यातील तीन मुले दिल्लीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 12:03 IST

स्क्रीनची केली सोय : अचिरा निसार, ऐश्वर्या विजापुरे, अभिषेक लोंढे यांना मिळाली संधी 

ठळक मुद्देदिल्ली येथील सी.बी.एस.ई. बोर्डाने आर्या पब्लिक स्कूलला कळविले होतेदिल्लीमध्ये सुमारे दोन हजार मुले या कार्यक्रमाला उपस्थित होतेकार्यक्रमात असलेली व्यवस्था अगदी भव्य अशी होती

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम सोमवारी दिल्लीत पार पडला. यामध्ये जिल्ह्यातील आकिरा निसार (केएलई, सोलापूर), ऐश्वर्या विजापुरे (केंद्रीय विद्यालय, सोलापूर) आणि अभिषेक लोंढे (आर्या पब्लिक स्कूल, पिंपळनेर) या तिघांचा या कार्यक्रमात समावेश होता. पंतप्रधानांसमवेतच्या कार्यक्रमात दिसणार म्हणून इथल्या शाळेत विद्यार्थी अन् गुरुजनांनी प्रोजक्टरद्वारे टीव्हीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा आनंद लुटला. 

 सोमवारी सकाळी ११ वाजता दिल्लीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पिंपळनेर (ता. माढा) येथील आर्या पब्लिक स्कूलचा इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी अभिषेक अनंत लोंढे याचा पंतप्रधानांशी थेट चर्चेत सहभाग होता. पंतप्रधानांना तो काय प्रश्न विचारतोय हे कुतूहलाने पाहण्यासाठी स्कूलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये एकच गर्दी केली होती. कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रोजेक्टर, सीपीओ व नेट कनेक्शन उपलब्ध करून ठेवण्यात आले होते. अतिशय सुंदर अशा कॉन्फरन्स हॉलमध्ये विद्यार्थी व शिक्षक हा लाईव्ह कार्यक्रम पाहत असल्याचे दिसून आले.

दिल्लीमध्ये सुमारे दोन हजार मुले या कार्यक्रमाला उपस्थित होते. इतक्या मुलांशी देशाचे पंतप्रधान संवाद साधतात आणि यात माझा समावेश असल्याने याचा खूप आनंद वाटत आहे. या संधीमुळे इतर राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला. कार्यक्रमात असलेली व्यवस्था अगदी भव्य अशी होती. आपण सुद्धा देशासाठी काहीतरी मोठे काम करु असा आत्मविश्वास मिळाला, असा अनुभव जुळे सोलापूर येथील के.एल.ई. इंग्लिश मीडियम स्कूलची दहावीची विद्यार्थिनी अचिरा निसार हिने सांगितला. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी तिची निवड झाली होती. अचिरा हिला शाळेचे प्राचार्य  शिवानंद शिरगावे यांचे मार्गदर्शन लाभले. 

स.हि.ने. प्रशालेतील सुमारे ८० विद्यार्थ्यांनी परीक्षा पे चर्चा या उपक्रमात सहभाग घेतला. शाळेच्या डिजिटल क्लासरुममध्ये प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेला सामोरे कसे जावे, याबाबत विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. यापुढे आणखी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरा जाण्याचा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापिका नीता येरमाळकर, शिक्षक नागेश जाधव व दिलीप राठोड आदी उपस्थित होते.

आॅनलाइन परीक्षेद्वारे झाली निवड- या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्ली येथील सी.बी.एस.ई. बोर्डाने आर्या पब्लिक स्कूलला कळविले होते. त्यानुसार डिसेंबर महिन्यात दिल्ली येथील मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सहभागी होणाºया विद्यार्थ्यांची दोन वेळा आॅनलाइन दोन वेगवेगळ्या विषयांवर परीक्षा घेतली होती. त्यामध्ये लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र स्टेट एज्युकेशन रिसर्च सेंटरने नियंत्रण केले होते. त्यामध्ये वरील तिघांची निवड झाली. यासाठी संपूर्ण खर्च शासनाने केला. 

टॅग्स :Solapurसोलापूरdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदीStudentविद्यार्थीMan ki Baatमन की बात