शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लेकरांना खांद्यावर घेऊन हजारो मजूरांचा शेकडो मैल पायी प्रवास...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 15:52 IST

परप्रांतीय मजुरांचा संयम सुटला;  अब जिये या मरे, बस अब हमे घर जाना है...

ठळक मुद्देसध्या महापालिकेच्या निवारा केंद्रात थांबलेल्या लोकांना रेल्वे, बसने सोडण्यात येत आहेशहरात आणि ग्रामीण भागात आपल्या कुटुंबासोबत राहणाºया परप्रांतीय लोकांपर्यंत प्रशासकीय अधिकारी पोहोचलेले नाहीतराज्य सरकार, केंद्र सरकारने यावर काम करणे अपेक्षित आहे. मजुरांची मोफत प्रवासाची सुविधा केली

सोलापूर : दो महिने हो गये.. काम बंद है.. घर में खाने के लिए कुछ भी नही... अब जिये या मरे.. यहाँ रुकना नही... घर जाना मतलब जानाच है... असा निर्धार करून शेकडो मजूर आपल्या मुलाबाळांना अंगाखांद्यावर घेऊन शहराबाहेर पडले आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनातील अधिकाºयांचे यांच्याकडे लक्ष नसल्याचे सोमवारी दिसून आले. 

राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश येथील शेकडो मजूर सोलापुरात स्थायिक झाले आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर काही लोक पायी गावाकडे निघाले. पोलिसांनी त्यांना रोखले आणि महापालिकेच्या निवारा केंद्रात सोडले. पोलिसांच्या धाकाने अनेक लोक बाहेर पडलेच नाहीत. मात्र आता रेल्वे सुरू होणार, लॉकडाऊन शिथिल होणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर मजुरांचा संयम सुटला आहे. 

सोमवारी दुपारी दोनच्या सुमाराला ‘लोकमत’च्या प्रतिनिधींना गांधी नगरजवळ काही मजूर भेटले. यातील सनद निशाद म्हणाले, आम्ही मूळचे छत्तीसगडच्या सोनेगावचे रहिवासी आहोत. रुबी नगर भागात राहतो. एका ठेकेदारामार्फत बांधकामाच्या साईटवर काम करतो. एक महिन्यापूर्वी ठेकेदार पळून गेला. घरात खायला अन्न नाही. आमच्यासोबत २० ते ३० कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. आता आम्हाला इथे थांबायचे नाही. चाहे कुछ भी हो जाये, हमे घर जाना है, असे ते म्हणाले. 

रेल्वेचं काही खरं नाही- रेल्वे सुरू होणार आहे, एसटी बस चालू होणार असल्याचे सरकार सांगत आहे. मग तुम्ही पायी का निघालात, असे विचारले असता सनद निशाद म्हणाले, आमचा सरकारवर भरवसा नाही. १५ दिवसांपासून रेल्वे सुरू होणार म्हणून सांगतात. अजून सुरू झाली नाही. रेल्वेत पैसे मागितले तर कुठून द्यायचे. बसवाल्याने पैसे मागितले तर कुठून द्यायचे, असा सवालही त्यांनी केला. 

सरकार, प्रशासन कमी पडतंयसध्या महापालिकेच्या निवारा केंद्रात थांबलेल्या लोकांना रेल्वे, बसने सोडण्यात येत आहे. परंतु, शहरात आणि ग्रामीण भागात आपल्या कुटुंबासोबत राहणाºया परप्रांतीय लोकांपर्यंत प्रशासकीय अधिकारी पोहोचलेले नाहीत. राज्य सरकार, केंद्र सरकारने यावर काम करणे अपेक्षित आहे. मजुरांची मोफत प्रवासाची सुविधा केली आहे, हा निरोप अद्याप पोहोचलेला नाही. सरकार कमी पडलेलं आहे. - रवींद्र मोकाशीसामाजिक कार्यकर्ते. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस