शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जो कमाया था, वो खर्चा और मजुरी देनेमे गया, म्हणत परप्रांतीय विक्रेत्यांनी सोडले सोलापुरातील होम मैदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 10:57 IST

सोलापूर : साब, जो कमाया था, वो खर्चा और मजुरी देनेमे गया. जितना पैसा डाले, उतना निकल गया. अब ...

ठळक मुद्देकेवळ १७ दिवसच झाला धंदा : तरीही पुढच्या वर्षी येणारच असल्याचेही केले स्पष्टहोम मैदानाच्या सुशोभीकरणामुळे ऐन यात्रेच्या तोंडावर प्रशासन आणि देवस्थान पंच कमिटीत वादयात्रा सोहळ्यातील चार प्रमुख विधी वेळेत झाल्याने गतवर्षीपेक्षा यंदा जोरात व्यवसाय झाल्याचेही परप्रांतीय आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधील विक्रेत्यांनी स्पष्ट केले

सोलापूर : साब, जो कमाया था, वो खर्चा और मजुरी देनेमे गया. जितना पैसा डाले, उतना निकल गया. अब खाली हात जा रहे है, असे म्हणत परप्रांतातील पाळणे, झुले विक्रेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपली खंत व्यक्त केली. होम मैदानाचा वाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा या प्रमुख कारणांमुळे यंदा ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत केवळ १७ दिवसच धंदा झाल्याचेही त्यांनी नमूद केले. 

स्मार्ट सोलापूर अंतर्गत रंगभवन अन् होम मैदानाच्या सुशोभीकरणामुळे ऐन यात्रेच्या तोंडावर प्रशासन आणि देवस्थान पंच कमिटीत वाद निर्माण झाला. काही अटी, नियम घालून होम मैदान पंच कमिटीच्या ताब्यात मिळाले ते दोन-तीन दिवस उशिरानेच. त्यातच ऐन यात्रेतच म्हणजे ९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे एक-दोन दिवस होम मैदान प्रशासनाने आपल्याकडे राखून ठेवले. परप्रांतातून येणारे पाळणे, झुले आणि इतर मनोरंजनात्मक स्टॉल्स उशिरा दाखल झाले. 

पाळणे, झुले, मौतका कुआँ आदींचे साहित्य होम मैदानावर येऊन पडले तरी त्या साहित्यांच्या बांधणी पूर्ण होण्यास १६ जानेवारीचा दिवस उजाडला. त्यामुळे १७ जानेवारीपासून खºया अर्थाने व्यवसाय सुरू झाला. यात्रा सोहळ्यातील चार प्रमुख विधी वेळेत झाल्याने गतवर्षीपेक्षा यंदा जोरात व्यवसाय झाल्याचेही परप्रांतीय आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधील विक्रेत्यांनी स्पष्ट केले. मात्र धंद्यात घातलेला पैसा निघाला. वाहतूक, मजुरी, भोजन आदींच्या व्यवस्थेत पैसाही संपला. पंच कमिटीने भाडेवाडीचा विचार करण्याची सूचनाही विक्रेत्यांनी केली. 

भाडेवाढ न केल्याचा आनंद- राठोड- अहमदनगर येथील प्रसिद्ध चिवडा म्हणून राज्यात परिचित आहे. चिवड्याचे प्रमुख दुर्गाप्रसाद राठोड यांनी यंदाच्या यात्रेत चांगला व्यवसाय झाल्याचे ‘लोकमत’शी बोलताना आनंद व्यक्त केला. यंदा पंच कमिटीने भाडेवाढ केली नाही, याचा विशेष आनंद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरवर्षीच्या यात्रेत होम मैदानावर पाळणे उभे करतो. केवळ १६-१७ दिवसच व्यवसाय झाला. ७० हजार रुपये भाडे देण्यात गेले. केवळ घातलेले पैसे निघाले. मजुरी, वाहतुकीचा खर्च पाहता हातात चार पैसे राहतील. पंच कमिटीने भाडे कमी करावे, अशी अपेक्षा आहे.-शिवकुमार चौहानपाळणा चालक- जॉनपूर, उत्तर प्रदेश.

‘पन्नालाल’चा शो झालाच नाही- दरवर्षी यात्रेत हुशार, चाणाक्ष गाढवाचे दर्शन घडते. पन्नालाल नाव धारण केलेल्या या गाढवाचे शो पाहताना हास्याचे फवारेही उडतात. यंदा पन्नालाल नावाचे दोन गाढव होम मैदानावर आले खरे; त्यापैकी एका गाढवाला शो करण्याची संधी मिळाली; मात्र दुसरा पन्नालाल मात्र लाकडी पिंजºयात बसून होता. केवळ होम मैदानावर जागा न मिळाल्याने या पन्नालालचा शो होऊ शकला नाही. त्यामुळे आमचे खूप नुकसान झाल्याचे राजू घुले (जळगाव) आणि कृष्णा पवार यांनी सांगितले.

पाळण्याच्या व्यवसायातून वाहतुकीचा खर्च, मजुरी आणि भोजनाचा खर्च निघाला. अगदी कमी दिवस मिळाल्याने चांगला व्यवसाय होऊ शकला नाही. इतर यात्रेत हा खर्च निघून जाईल. काही झाले तरी पुन्हा सोलापूरच्या यात्रेत येणार म्हणजे येणारच. -रामदिन चौहान (जॉनपूर, उत्तर प्रदेश)

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्रा