शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या वाळूने बांधकाम करणाऱ्यांना आता प्रति ब्रास ४० हजाराचा दंड होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 17:54 IST

मंगळवेढा शहरातील वाळूचे साठे जप्त करण्याची मोहीम तीव्र; दहा जणांचे पथक

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

वाळूची चोरी रोखण्यासाठी  मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी  कंबर कसली असून आता विना परवाना रॉयल्टी वाळू  आढळल्यास त्या बांधकाम मालकास  दंडात्मक कारवाईला समोर जावे लागणार आहे. यात एक ब्रास वाळूकरीता तब्बल ४० हजार  रुपये दंड निर्धारित केला आहे. तहसीलदार स्वतः बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावर जाऊन  रॉयल्टीची पडताळणी करत आहेत. तलाठी, मंडल अधिकारी व पोलीस यांच्या १० जणांच्या पथकाने  रविवार पासून मंगळवेढा शहरात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. 

सध्या जिल्ह्यात कुठेही वाळू लिलाव सुरू नाहीत तरीही तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात मोठ्याप्रमाणात बांधकाम सुरू आहे. त्यासाठी नागरिक वाळू विकत घेत आहेत. वाळू विनारॉयल्टी नसावी, विनारॉयल्टी वाळू वापर दंडात्मक कारवाईस पात्र आहे. त्यामुळे नागरिकांनी वाळूची गौण खनिज नियमानुसार वाहतूक पावती (रॉयल्टी पास) घेऊनच वाळू खरेदी करावी, असे आवाहन तहसीलदार स्वप्निल रावडे  यांनी केले आहे.

बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी अवैध मार्गाने विनारॉयल्टी विक्री, साठवणूक व खरेदी करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. .वाळू लिलाव बंद असताना  ठिकठिकाणी वाळूचे ढिग ही स्थिती वाळू चोरीकडे दिशानिर्देश करीत आहे. रात्रीच्या सुमारास वाळूचोरी होत असल्याने प्रशासनसुद्धा हतबल झाल्याचे चित्र आहे.महसूल विभाग आता वाळू खरेदीच्या पडताळणीची कारवाई करणार असल्याने अवैध वाळू वाहतूक, चोरी व विक्रीवर आळा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेजारच्या तालुक्यातील  वाळूमाफियांनी काही महिन्यापासून अक्षरश: धुडगूस घातला आहे.

महसूलच्या नियुक्त पथकाला चुकवून रात्री-अपरात्री वाळूचा अवैधरीत्या  वाहतुक केली जात आहे. यामध्ये नुकताच एका पोलिसाला जीव द्यावा लागला आहे . वाळू चोरांचा रॉयल्टी नसतानाही हा गोरखधंदा सुरू आहे.यामध्ये  शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.ही बाब निदर्शनास येत असल्याने तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी याला आळा बसण्यासाठी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई चे सत्र सुरू केले आहे मागील काही दिवसात अनेक उपाय योजना आखल्या जात असून चोरीला आळा घालण्याचे काम केले जात आहे. अवैध वाळू उचल थांबविण्यास तातडीने वाळूचे  लिलाव केले जाणे गरजेचे आहे.मात्र  हे होत नसताना तूर्तास ही वाळू चोरी थांबविण्याच्या दृष्टीकोनातून उचललेल्या पावलाने वाळू चोरी रोखण्यास एक पाऊल पुढे पडले आहे------------------------------रॉयल्टी पावतीद्वारेच वाळू खरेदी करणे आवश्यक आहे. खरेदी केलेली वाळू, रितसर वाहतूक पावतीची मूळ प्रत विक्री करणाऱ्या कडुन   प्राप्त करून ती जतन करावी व महसूल विभागाच्या नियुक्त पथकाद्वारे चौकशी झाल्यास वापर केलेल्या, साठविण्यात आलेल्या गौण खनिजाची वाहतूक पावती दाखवण्यात यावी, अन्यथा शासन नियमानुसार प्रति ब्रास  पाचपट दंडाच्या तरतुदीनुसार ४० हजार  रुपये याप्रमाणे  दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नंदुरबार येथील रॉयल्टी पावती वर सुद्धा वाळू खाली करण्याचे  ठिकाण   मंगळवेढा असेल तरच ती पावती ग्राह्य धरली जाणार आहे अन्यथा त्या वाळूवर ही कारवाई केली जाणार आहे, असे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी सांगितले .

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस