शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
6
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
7
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
8
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
9
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
10
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
11
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

थर्टीफर्स्ट...! खुशाल प्या... पण मद्यसेवन परवाना जवळ ठेवा, सोलापूरच्या उत्पादन शुल्क खात्याकडून दीड लाख परवाने वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 12:55 IST

गेल्यावर्षी नोटाबंदीमुळे मद्यप्रेमींना थर्टीफर्स्टचा एन्जॉय मनाप्रमाणे करता आलेला नाही. मद्यपींना आपल्या मोहाला आवर घालावा लागला होता; मात्र यावर्षी इयरएंड साजरा करण्यासाठी आधीपासूनच तयारी करणाºया उत्साही जणांना उत्पादन शुल्क खात्याकडून खुशाल प्या पण एक दिवसीय परवाना जवळ बाळगा असा  प्रेमळ कायदेशीर सल्ला देण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देएक आॅगस्टपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील उत्पादन शुल्क खात्याने मद्यपानाचे परवाने आॅनलाईनकायमस्वरूपी, वार्षिक आणि एकदिवसीय असे परवाने थेट मिळत असल्यामुळे मद्यप्रेमींना कार्यालयात येण्याची गरज नाही खुशाल प्या पण एक दिवसीय परवाना जवळ बाळगा असा  प्रेमळ कायदेशीर सल्ला

महेश कुलकर्णी आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २८ : गेल्यावर्षी नोटाबंदीमुळे मद्यप्रेमींना थर्टीफर्स्टचा एन्जॉय मनाप्रमाणे करता आलेला नाही. मद्यपींना आपल्या मोहाला आवर घालावा लागला होता; मात्र यावर्षी इयरएंड साजरा करण्यासाठी आधीपासूनच तयारी करणाºया उत्साही जणांना उत्पादन शुल्क खात्याकडून खुशाल प्या पण एक दिवसीय परवाना जवळ बाळगा असा  प्रेमळ कायदेशीर सल्ला देण्यात आलेला आहे.राज्यभरात दरवर्षी ३१ डिसेंबर साजरा करणाºयांची संख्या लक्षणीय आहे. राज्य शासनाच्या वतीने ख्रिसमसपासून तीन दिवस रात्री उशिरापर्यंत वाईन शॉप आणि परमिट रुम सुरू ठेवण्याची परवानगी मिळते. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील उत्पादन शुल्क खात्याच्या वतीने देशी मद्यसेवनाचे एक लाख परवाने विविध मद्यविक्री दुकानांमध्ये वाटप करण्यात आले आहेत. तसेच देशी मद्यसेवनाचे ५४,३०० परवाने वाटप करण्यात आले आहेत. मद्यपींनी थर्टीफर्स्ट जोरदार साजरा करावा, परंतु शासनाच्या नियमानुसार एक दिवसीय परवाना काढावा, असे आवाहन उत्पादन शुल्क खात्याकडून करण्यात आले आहे. एक वाईनशॉपमध्ये एक हजार मद्यसेवन परवाने ठेवण्यात आलेले आहेत. तसेच देशी दारूचे दुकान आणि परमिट रुममध्ये एक लाख परवाने ठेवले आहेत. एका परवान्याची किंमत पाच रुपये आहे.शहर आणि जिल्ह्यात एकूण ८४६ मद्यविक्रींची दुकाने आहेत. या सर्व दुकानांतून थर्टीफर्स्टच्या रात्री मोठ्या प्रमाणावर मद्यविक्री होते. पहाटेपर्यंत सुरू राहणाºया बारमध्ये होणाºया मद्यविक्रीतून शासनाला अधिकाधिक महसूल मिळण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून उत्पादन शुल्क खात्याकडून बनावट आणि बेकायदेशीरपणे बाहेरून आलेल्या मद्यावर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसात चार ठिकाणी छापे मारून बनावट मद्य जप्त करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क खात्याच्या वतीने देण्यात आली. -------------------------आॅनलाईनमुळे सोय !एक आॅगस्टपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील उत्पादन शुल्क खात्याने मद्यपानाचे परवाने आॅनलाईन केल्यामुळे यावर्षी उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयातील कामाचा व्याप कमी झाला आहे. कायमस्वरूपी, वार्षिक आणि एकदिवसीय असे परवाने थेट मिळत असल्यामुळे मद्यप्रेमींना कार्यालयात येण्याची गरज नाही.---------------------------शहर-जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकानेपरमिट बार             - ४००बीअर शॉपी        - ३००देशी दारू दुकाने - १२४वाईन शॉप            -  ४०मद्यसेवन परवानेकायमस्वरूपी     - ७७,५३२वार्षिक              - ३८,८९४एक दिवसीय देशी                           -१,००,०००विदेशी            -    ५४,३००-------------------------सरत्या वर्षाला निरोप अन् येणाºया नव्या २०१८ सालाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत परमिट रुम-बीअर बार, बीअर शॉपी खुली असली तरी मद्यप्रेमींनी परमिट (पिण्याचे लायसन) घेतल्याशिवाय मद्यपान करू नये.रवींद्र आवळेअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग

टॅग्स :Solapurसोलापूर