शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

थर्टीफस्ट...! चोºया अन् घरफोड्यांनी सोलापूर शहरातील जनता त्रासली, ९९ जणांवर हद्दपारीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 13:07 IST

सरत्या वर्षाला निरोप देताना शहरातील जनतेला चोºया आणि घरफोड्यांनी वैताग आणला. वर्षभरात ६८३ अशा घटना घडल्या. यामध्ये १९४ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

ठळक मुद्देसरत्या वर्षाला निरोप देताना शहरातील जनतेला चोºया आणि घरफोड्यांनी वैताग आणलावर्षभरात ६८३ अशा घटना घडल्या. यामध्ये १९४ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले वर्षभरात २३ हजार ८९० जणांना समन्स व ५ हजार ८८७ जणांना वॉरंट बजावण्यात आले

विलास जळकोटकर आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर: सरत्या वर्षाला निरोप देताना शहरातील जनतेला चोºया आणि घरफोड्यांनी वैताग आणला. वर्षभरात ६८३ अशा घटना घडल्या. यामध्ये १९४ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. त्याचे शेकडा प्रमाण २८.४० ठरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०६ गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. गतवर्षी अशा ५७७ घटना घडल्या होत्या. गुन्ह्याचे हे प्रमाण वाढले असले तरी जनतेला धोकादायक व्यक्तींपासून दिलासा देण्याच्या दृष्टीने नऊ जणांवर एमपीडीएची कारवाई करुन राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. तसेच ९९ जणांना तडीपार करण्यात आले आहे. वर्षभरात शहराच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, दरोडा आणि बलात्कार अशा घटनांच्या बाबतीत मात्र १०० कारवाई करण्यात पोलिसांना यश आले आहे. खुनाच्या १०, खुनाचा प्रयत्न २०, सदोष मनुष्यवध २, बलात्कार ४१ आणि दरोडा ७ अशा घटना घडल्या. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चेन स्नॅचिंग, जबरी चोºया, आणि घरफोड्यांनी नागरिकांना भयभीत केले. शहरात चालणाºया अवैध धंद्यांच्या बाबतीत मात्र आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने दिलासादायक कारवाई केल्याची आकडेवारी सांगते. जुगार आणि दारुबंदीचे १९७३ गुन्हे नोंदले गेले. त्यापैकी १९६७ गुन्ह्याचा उकला झाला आहे. शेकडा ९९.७० गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण आहे. नोव्हेंबर २०१७ अखेर १९३४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. गतवर्षी अशा ११९८ कारवाया होत्या. त्यात ७३६ कारवाया करण्यात आल्या. गेल्या तीन वर्षांच्या एमपीडीएच्या कारवाईत यंदा १३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात नागपूर, पुणे नंतर सोलापूरचा आकडेवारीत तिसरा व टक्केवारीत प्रथम क्रमांक आहे. ही आयुक्तालयाची जमेची बाजू असल्याचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली. सार्वजनिक जीवनात धोकादायक ठरणाºया ९९ जणांना तडीपारीचा आदेश या वर्षात बजावण्यात आला. यात ७ टोळ्यांमधील ४५ जणांचा समावेश आहे. दारुधंदे करणाºया २५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली. २०१६ च्या कारवाईपेक्षा हे प्रमाण १०५ ने अधिक आहे. याशिवाय सामाजिक जाणिवेतून शाळांमधील ९९१३ मुला-मुलींना वाहतुकीबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. एकूणच सरते वर्षे घरफोड्यांनी नागरिकांना हैराण केले असलेतरी पोलीस आयुक्तालयाने डिजीटल सेवांच्या माध्यमातून शिवाय सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने समाधानकारक कामगिरी केल्याचे दिसून आले. आगामी काळातही हे चित्र असावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.--------------------नव्या वर्षात चार पोलीस ठाणे - जनतेला अधिकाधिक सुरक्षित सेवा देण्यासाठी पोलीस आयुक्तालय सज्ज आहे. जनतेनेही सहकार्य करावे. शहराची लोकसंख्या वाढल्याने नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. यात विजापूर नाका हद्दीतील जुळे सोलापूर, सैफुल आणि हत्तुरे वस्ती तर फौजदार चावडी हद्दीतील बाळे या चार ठिकाणांचा समावेश आहे. आगामी वर्षात ही कार्यवाही होईल, अशी अपेक्षा पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली.---------------५८८७ जणांना बजावले वॉरंटविविध गुन्ह्याखाली वर्षभरात २३ हजार ८९० जणांना समन्स व ५ हजार ८८७ जणांना वॉरंट बजावण्यात आले. हे प्रमाण ६४.२१ असून, अन्य प्रलंबित समन्स, वॉरंट बजावण्यासाठी त्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली आधार घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गुन्हे शाखेने सुप्त खटल्यातील वॉरंट बजावण्यासाठी नोव्हेंबर १५ पासून तीन पथके नियुक्त केले आहेत. विशेष पथकातील पोलिसांनी आजवर ५१३ जणांना वॉरंट बजावले आहे. या पथकाची स्थापना केल्यापासून आजतागायत १३४४ वॉरंट बजावले आहे. --------------------------नियमबाह्य वाहतूक; ४.६३ लाखांचा दंड- २७ मे पासून ई-चलन मोहीम राबवण्यात आली. त्यात नोव्हेंबर अखेर ४३३९ वाहनांवर तर १९०७ जणांवर कारवाई करण्यात आली. या पोटी ४ लाख ६३ हजारांचा दंडही वसूल झाला आहे. नियमबाह्य वाहन चालवणाºया चालकांवर जरब बसावी, या दृष्टीने शहरात ४२७ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.------------------------मालाचे १४१ गुन्हे उघडकीस- वर्षभरात जबरी चोरी, घरफोड्या अशा दाखल ८७५ गुन्ह्यातील ३ कोटी ७६ लाख २८ हजार १६२ रुपयांचा ऐवज चोरीला गेला. त्यातील १ कोटी ४८ लाख ८३ हजार ६६६ रुपयांचा माल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्ह्याचा उकल होण्याचे हे प्रमाण ३९.५५ टक्के आहे. १४१ गुन्हे उघडकीस आले आहेत. वाढते गुन्हे ही चिंतेची बाब असली तरी अधिकाधिक गुन्ह्याचा उकल करण्याच्या दृष्टीने विशेष मोहिमा, पथकांद्वारे ही कारवाई निरंतर सुरु असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस